AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय, अभिताभ बच्चन यांचे नाव घेत राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाली. बिहार राज्याचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा झेंडा युपी राज्य अध्यक्ष अजय राय यांच्याकडे सुपूर्द केला. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी एआयसीसी सचिव आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते चंदौली येथे उपस्थित होते.

ऐश्वर्या राय, अभिताभ बच्चन यांचे नाव घेत राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
RAHUL GANDHIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 17, 2024 | 7:25 PM
Share

उत्तर प्रदेश | 17 फेब्रुवारी 2024 : अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे नाव घेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ बिहारमधून उत्तर प्रदेशात दाखल झाली. येथील चंदौली जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, देशाची दोन तुकड्यांमध्ये विभागणी झाल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाली. बिहार राज्याचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा झेंडा युपी राज्य अध्यक्ष अजय राय यांच्याकडे सुपूर्द केला. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी एआयसीसी सचिव आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते चंदौली येथे उपस्थित होते. अजय राय यांच्यासोबत यावेळी आमदार आराधना मिश्रा यादेखील उपस्थित होत्या.

चंदौली येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्यात आदिवासी राष्ट्रपती आणि गरिब यांना कुणालाही जागा नव्हती. 22 जानेवारीला बडे उद्योगपती आणि सिनेतारका यांच्यासाठी रेड कार्पेट देण्यात आले होते. यातील एक टक्का हे खाजगी विमानात प्रवास करणारे आहेत. पण, जे गरीब आणि बेरोजगार आहेत त्याचे काय असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

नरेंद्र मोदी यांना राम मंदिराच्या कार्यक्रमात पाहिले. अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनाही पाहिले. देशातील सर्व अब्जाधीश तिथे होते. पण, आमचे आदिवासी राष्ट्रपती तिथे नव्हते. कोणी शेतकरी दिसला नाही. गरीब माणूस दिसला नाही. बेरोजगारांसाठी जागा नव्हती. आज भारताचे दोन तुकडे झाले आहेत. एका बाजूला गरीब, बेरोजगार लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला विमानाने प्रवास करणारे एक टक्का लोक आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

गरिबांसाठी श्रमाचा मार्ग खुला आहे हे सत्य आहे. परंतु, जर तुम्ही अब्जाधीश असाल. मोदीजींचे मित्र असाल तर तुम्ही जमीन, विमानतळ, रेल्वे काहीही खरेदी करू शकता. दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या राय एका बाजूला डान्स करताना दिसणार आहे. दुसरीकडे अमिताभ बच्चन फलंदाजी करताना दिसणार आहेत. शाहरुख खान दिसणार आहे. विराट कोहली दिसणार आहे. पण, त्यांना भूक दिसणार नाही. बेरोजगार दिसणार नाही, अग्निवीर दिसणार नाही असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. शेतकरी आणि गरिबांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. देशात महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे, पण, देशात महागाई वाढत असल्याचे तुम्ही टीव्हीवर पाहिले नसेल. मोदी मीडिया तुम्हाला हे दाखवेल. ते तुम्हाला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय दाखवतील. पाकिस्तानबद्दल व्याख्याने देतील. पण, बेरोजगारी, महागाई याविषयी दिसणार नाही असे राहुल गांधी यांनी सांगितले.

लोकांना कोणती विचारधारा पाळायची आहे. ज्याने भावाला भावाच्या विरोधात उभे केले अशी विचारधारा हवी की ‘प्रेमाची दुकाने’ उघडणारी आणि सर्वांसाठी हक्क सुनिश्चित करणारी विचारधारा हवी असा प्रश्न राहुल गांधी यांनी जनतेला विचारला. बेरोजगारी आणि महागाई या दोन सर्वात मोठ्या समस्या असताना देशावर सामाजिक आणि आर्थिक अन्यायही होत आहे असेही ते यावेळी म्हणाले.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.