व्हॅलेंटाईन सरप्राईज! महिलेने व्यासपीठावर येऊन राहुल गांधींचा किस घेतला

व्हॅलेंटाईन सरप्राईज! महिलेने व्यासपीठावर येऊन राहुल गांधींचा किस घेतला

वलसाड (गुजरात) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक अनपेक्षित धक्का मिळाला. ते गुजरात दौऱ्यावर असताना एका महिलेने व्यापीठावर येऊन राहुल गांधींचा किस घेतला. याला कुणी व्हॅलेंटाईन सरप्राईज म्हणत आहे, तर कुणी काहीही उपमा देत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

गुजरातमधील वलसाड येथे काँग्रेसकडून एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुल गांधी व्यासपीठावर असताना काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या त्यांचं स्वागत करण्यासाठी व्यासपीठावर आल्या. यावेळी एका महिलेने अनपेक्षित राहुल गांधी यांच्या गालाचा किस घेतला.

या घटनेनंतर राहुल गांधी यांनी स्मित हास्य दिलं. महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचं गळ्यात हार घालून स्वागत केलं. राहुल गांधी यांना किस करणाऱ्या महिलेचं नाव कश्मीरा मुंशी असून, त्या महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. कश्मीरा मुंशी आणि गांधी कुटुंबीयांचे कौटुंबीक संबंध असल्याचं बोललं जातं.

दरम्यान, यापूर्वीही अशीच एक घटना घडली होती. 2014 मध्ये राहुल गांधी आसामच्या दौऱ्यावर असताना एका महिलेने त्यांच्या गालावर किस केला होता.

Published On - 5:02 pm, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI