हिटलर 2 कोटी नोकऱ्या देणार होता, हाऊज द जॉब्स, राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

हिटलर 2 कोटी नोकऱ्या देणार होता, हाऊज द जॉब्स, राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

मुंबई: राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या बेरोजगारीसंदर्भातील अहवालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी मोदींचा थेट हिटलर असा उल्लेख करुन, हाऊज द जॉब असा प्रश्न विचारला.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या बेरोजगारीसंदर्भातील अहवालानं केंद्र सरकारची पोलखोल केली. या अहवालात देशातल्या 2017-18 मधील बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर पोहोचल्याचं म्हटलं आहे. देशातील बेरोजगारीच्या दराने 45 वर्षातील सर्वोच्च पातळी गाठल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

बेरोजगारीच्या या आकड्यांचा संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली.

“NoMo जॉब्ज ! हा हिटलर वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार होता. 5 वर्षानंतर, फुटलेली माहिती बघितली तर राष्ट्रीय आपत्तीच उघडी पडलीय. ही 45 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी आहे. नुसत्या 2017-18 मध्येच 6.5 कोटी लोक बेकार झाले आहेत. आता NoMo ला Go म्हणण्याची वेळ आली आहे. #HowsThejobs” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा अहवाल

कोट्यवधी रोजगार निर्मितीचं आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारचा खरा चेहरा उघड पडला आहे. देशात गेल्या 45 वर्षातील रोजगाराची सर्वात वाईट स्थिती असल्याची आकडेवारी समोर आली आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस अर्थात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (NSSO) ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षभरात 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के होता. हा दर गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच इथवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या 

मोदी सरकारचं पितळ उघड, रोजगाराची स्थिती 45 वर्षात सर्वात वाईट 

अर्थसंकल्पापूर्वी आणखी धक्का, NSC च्या दोन सदस्यांचा राजीनामा 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI