VIDEO : राज ठाकरेंचे ‘व्यंगचित्र’ भन्नाट, मात्र ‘सेल्फी’ काही जमेना!

मुंबई : आपल्या वक्तृत्त्वाने आणि व्यंगचित्रातील फटकाऱ्याने भल्याभल्यांना गारद करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘सेल्फी’ मात्र काही जमत नसल्याचे दिसले. अर्थात, हा काही गंभीर विषय नाही. मात्र, आज मनसेच्या दीपोत्सवादरम्यान राज यांना सेल्फी जमत नसल्याचे दिसले आणि उपस्थितांमध्ये काहीसे कुतुहलाची भावना निर्माण झाली. राज ठाकरेंचे चाहते राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राज यांच्या बारीक-सारीक […]

VIDEO : राज ठाकरेंचे 'व्यंगचित्र' भन्नाट, मात्र 'सेल्फी' काही जमेना!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : आपल्या वक्तृत्त्वाने आणि व्यंगचित्रातील फटकाऱ्याने भल्याभल्यांना गारद करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘सेल्फी’ मात्र काही जमत नसल्याचे दिसले. अर्थात, हा काही गंभीर विषय नाही. मात्र, आज मनसेच्या दीपोत्सवादरम्यान राज यांना सेल्फी जमत नसल्याचे दिसले आणि उपस्थितांमध्ये काहीसे कुतुहलाची भावना निर्माण झाली. राज ठाकरेंचे चाहते राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राज यांच्या बारीक-सारीक गोष्टी सुद्धा कुतुहल निर्माण करणाऱ्या असतात. सेल्फीचं हे प्रकरण सुद्धा त्यात मोडणारे.

त्याचं झालं असं की, मनसेने स्वखर्चाने दादर येथील शिवाजी पार्कजवळ दीपोत्सव साजरा केला आहे. रोज विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहून इथे दीपोत्सव साजरा करतात. यावेळी राज ठाकरे, त्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर असतात. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांसह इतरही अनेकजण आवर्जून दीपोत्सवात सहभागी होतात.

आज दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले आल्या होत्या. तसेच, राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, माजी आमदार नितीन सरदेसाई यांसह शेकडो जण इथे उपस्थित होते. दीपोत्सवाचा मुख्य कार्यक्रम होण्याआधी राज ठाकरे यांनी आशा भोसले यांच्यासोबत एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही त्यांना जमला नाही. सेल्फी घेताना राज ठाकरे यांचा काहीसा गोंधळ उडाला. मग काय, एरवीसुद्धा राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या शर्मिला ठाकरे मदतीला धावून आल्या.

शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या हातून मोबाईल आपल्या हाती घेतला. तोच राज ठाकरे पटकन आशा भोसले यांच्या मागे जाऊन उभ्या राहिले. अखेर शर्मिला ठाकरे यांनी सेल्फी काढला. अर्थात, राज ठाकरेंना सेल्फी काढताच येत नसेल, असेही नाही. मात्र, आज सेल्फी काढताना त्यांचा काहीसा गोंधळ उडाला आणि हा गोंधळ कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला. यावेळी राज ठाकरेंनी आशा भोसले यांची फोटोग्राफी सुद्धा केली.

एरवी आपल्या व्यंगचित्रांमधून भल्याभल्या राजकीय नेत्यांना फटकारे देणाऱ्या राज ठाकरेंचा सेल्फी घेताना उडालेला गोंधळ पाहण्याजोगा होता.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.