AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरं उघडण्यासाठी भाजप, वंचित, एमआयएमनंतर मनसे मैदानात, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम

आधी भाजपने राज्यभर मंदिरांसाठी घंटानाद आंदोलन केलं. त्यानंतर पंढरपुरात मंदिरासाठी प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन करत विठ्ठल मंदिरात प्रवेश केला.

मंदिरं उघडण्यासाठी भाजप, वंचित, एमआयएमनंतर मनसे मैदानात, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम
| Edited By: | Updated on: Sep 04, 2020 | 12:41 AM
Share

मुंबई : मंदिरं उघडावीत यासाठी भाजप, वंचित, एमआयएमनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मैदानात उतरण्याच्या (Raj Thackeray Gave Ultimatum To Thackeray Government) तैयारीत आहेत. कारण, मंदिरांबाबत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अल्टिमेटम दिलं आहे. नको ते पुरोगामित्व दाखवू नका, अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे (Raj Thackeray Gave Ultimatum To Thackeray Government).

थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रद्वारे राज ठाकरेंचं अल्टिमेटम

आधी भाजपने राज्यभर मंदिरांसाठी घंटानाद आंदोलन केलं. त्यानंतर पंढरपुरात मंदिरासाठी प्रकाश आंबेडकरांनी आंदोलन करत विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. औरंगाबादमध्ये एमआयएमही मंदिरासाठी मैदानात उतरली. पण, पोलिसांनी रोखल्याने आंदोलन मागे घेतलं आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंदिरं उघडावी यासाठी मैदानात उतरले आहेत.

काही दिवसांआधीच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळीही राज ठाकरेंनी मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. पण, अनलॉक-4 मध्येही मंदिरांबाबत नियमावली न आल्याने, राज ठाकरेंनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय.

नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारुन मंदिर प्रवेश करावा लागेल – राज ठाकरे

सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे. देवा ह्या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये. त्यामुळं सरकारने मंदिरं सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारुन मंदिर प्रवेश करावा लागेल, पण मी आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही (Raj Thackeray Gave Ultimatum To Thackeray Government).

धार्मिक स्थळं केवळ भक्तीपुरतीच मर्यादित नाही. तर मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळांभोवती एक अर्थव्यस्थाही आहे. मात्र, कोरोनामुळे जवळपास साडे 5 महिन्यांपासून मंदिरं, मशिदी, गुरुद्वारे आणि इतर धार्मिक स्थळांना टाळं लागलं आहे.

मंदिरांचच बोलायचं झालं, तर मुंबईतल्या सिद्धिविनायक, शिर्डी, तुळजापूर, वणी, अक्कलकोट, आणि जेजुरी खंडेरायांच्या मंदिराचं उत्पन्न बंद झालं. धार्मिक स्थळांभोवती प्रसाद, हार-फुलं विकणाऱ्या गरिबांची रोजीरोटी बंद झाली. मंदिरं बंद असल्याने शेतकऱ्यांना फुलांना मागणी नाही. धार्मिक स्थळांशेजारील हॉटेल्स, लॉज ठप्प झाले आहेत.

मात्र, कोरोनाचं संकट आणि वाढत्या रुग्णसंख्येचा दाखला देत असल्यानं, सरकार अजून तरी धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मूडमध्ये नसल्याचंच दिसतं आहे. त्यामुळेच आता धार्मिक स्थळं सुरु करण्यासाठी थेट आंदोलनं सुरु झाली आहेत.

कोरोनाचं संकटाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मात्र, धार्मिक स्थळांना आणखी टाळे लावणे म्हणजे आर्थिक चाकं अजून रुतवल्यासारखं होईल. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच, नियमावली आखून धार्मिक स्थळं कशाप्रकारे सुरु करता येतील, याचा सरकारनं नक्कीच विचार करायला हवा.

Raj Thackeray Gave Ultimatum To Thackeray Government

संबंधित बातम्या :

Special Report | औरंगाबादमध्ये मंदिर आणि मशिदीसाठी एमआयएमचा हायव्होल्टेज ड्रामा, इम्तियाज जलील आंदोलन करण्यावर ठाम

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.