AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंबाबत इगतपुरी कोर्टाचा मोठा निकाल

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. 2008 साली परप्रांतीयांविरोधात मनसैनिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन केले होते. या प्रकरणात इगतपुरी कोर्टाने राज ठाकरे यांना जामीन मंजूर केला आहे. आज राज ठाकरे यांनी याच खटल्यासाठी इगतपुरी कोर्टात हजेरी लावली. 2008 साली परप्रांतीयांविरोधात मनसैनिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन केल्याच्या प्रकरणाच्या खटल्यासाठी […]

राज ठाकरेंबाबत इगतपुरी कोर्टाचा मोठा निकाल
फोटो सौजन्य - MNS Adhikrut चं ट्विटर हँडल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. 2008 साली परप्रांतीयांविरोधात मनसैनिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन केले होते. या प्रकरणात इगतपुरी कोर्टाने राज ठाकरे यांना जामीन मंजूर केला आहे. आज राज ठाकरे यांनी याच खटल्यासाठी इगतपुरी कोर्टात हजेरी लावली.

2008 साली परप्रांतीयांविरोधात मनसैनिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन केल्याच्या प्रकरणाच्या खटल्यासाठी राज ठाकरे यांनी आज न्यायदंडाधिकारी के आय खान यांच्या न्यायालयात हजेरी लावली. परप्रांतीयांच्या विरोधात 21 ऑक्टोबर 2008 साली मनसेने आंदोलन केले होते. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलवर दगडफेक केली होती.

या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून, तेव्हापासून इगतपूरी न्यायालयात कटला सुरु आहे. राज ठाकरेंसह इतर सहा मनसैनिकांविरोधात खटला सुरु आहे. इतर सहा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये जाणार असल्याने मनसेचा विस्तार ग्रामीण भागात करण्यावर त्यांचा भर असेल.

नाशिक हा एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला. नाशिककरांनी राज ठाकरे यांना भरभरून प्रतिसाद देत तब्बल 40 नगरसेवक आणि तीन आमदार निवडून दिले. मात्र मधल्या काळामध्ये मोदी लाटेत मनसेचा नाशिकमध्ये धुव्वा उडाला. गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये तर मनसेला 40 वरून थेट पाच नगरसेवकांतपर्यंत खाली यावं लागलं. अशातच राज ठाकरे यांचा करिष्मा ओसरतो की काय असं वाटायला लागलं.. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाले आणि राज ठाकरे यांनीही अचूक संधी साधत नाशिकचा दौरा आयोजित केला.

राज ठाकरे आणि नाशिककरांचं वेगळंच नातं आहे. राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून त्यांना नाशिकबद्दल आपुलकी आहे. मनसेची सत्ता हातात आल्यानंतर राज ठाकरे यांनी शहरात अनेक विकासकामं केली. मात्र सत्तापालट झाल्यानंतर मनसेच्या या कामांना बंद करण्याचा जणू चंगच भाजपने बांधला. त्यामुळेच आपल्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे सत्ताधारी भाजपवर तुटून पडणार अशी चिन्हं आहेत.

एकूणच राज ठाकरे यांच्या या चार दिवसांच्या दौऱ्याकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राज ठाकरे सध्या बॅकफूटवर असले तरी ते फार काळ बॅकफूटवर राहतील असं नाही. त्यामुळे देशात बदललेली हवा राज ठाकरे नाशिकमध्ये बदलू शकतात का याकडे मनसे कार्यकर्त्यांचं आणि नाशिककरांचं लक्ष लागलंय.

राज ठाकरे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. नुकताच त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ दौरा केला. आता खान्देशातही मनसेचं संघटन मजबूत करण्यावर ते भर देण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...