Raj Thackeray : राज ठाकरेंना पुन्हा कोरोनाची लागण! आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली

राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया होणार होती. ती शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना पुन्हा कोरोनाची लागण! आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 01, 2022 | 6:31 AM

मुंबई : राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्हा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. राज ठाकरे यांच्यावर आज (1 जून) लिलावती रुग्णालयात पायावर शस्त्रक्रिया (Surgery) होणार होती. ती शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. राज्यतही कोरोनाचे रुग्ण काही ठिकाणी पुन्हा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनही पुन्हा अलर्ट मोडवर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याच्याआधीही कोरोनाची लागण झाली होती. तर त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे 22 ऑक्टोबर 2021 रोजी निदर्शनास आले होते. त्यांना त्यावेळी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच राज ठाकरे यांना मोनोक्लोनल अँटीबॅाडी कॉकटेल दिलं जाणार होतं. आता पुन्हा त्यांना कोरोना झाल्याने चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना

कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्या आई यांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झाले होते. तर आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. तर यावेळी त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आली आहे.

मास्क वापरण्यास राज ठाकरेंचा वेळोवेळी नकार

मास्क वापरण्यास राज ठाकरे हे गेल्या दोन वर्षात वेळोवेळी नकार देताना आणि विनामास्क फिरताना दिसून आले आहेत. ते गर्दीतही विनामास्कच वावरत असतात. त्यामुळे त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त होती आणि आत्ता तेच झालं आहे. त्यामुळे त्यांना किमान आत्ता तरी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईतही कोरोना रुग्ण वाढले

राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. आज 506 नवे कोरनाचे रुग्ण आढळल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. तर एकूण 2526 सक्रिय कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.

बीएमसीने दिलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी

हे सुद्धा वाचा

शस्त्रक्रियेसाठी वाट पाहवी लागणार

राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत त्यांवर लवकच शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती दिली होती. तसेच त्यांना काय काय त्रास होतोय याबाबतही ते कार्यकर्त्यांशी मोकळेपणाने बोलते होते. मात्र आता कोरोना झाल्याने शस्त्रक्रिया प्लॅन फेल झाल्याने आता पुन्हा त्यांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे. एवढं मात्र नक्की.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें