AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णांच्या भेटीसाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना

मुंबई : महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राळेगणसिद्धीकडे रवाना झाले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका अण्णा हजारे यांनी जाहीर केली आहे. राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे […]

अण्णांच्या भेटीसाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राळेगणसिद्धीकडे रवाना झाले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत. लोकपाल नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका अण्णा हजारे यांनी जाहीर केली आहे.

राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना

राळेगणसिद्धीमध्ये जाऊन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. तसेच, अण्णांच्या जिवाशी खेळू नका, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: राळेगणसिद्धीकडे रवाना झाला आहेत. राज ठाकरे हे अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत.

…तर 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ परत करेन : अण्णा हजारे

गिरीश महाजनांच्या भेटीसाठी काय झालं?

राळेगणसिद्धीमध्ये जाऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज अण्णा हजारेंना भेटले. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, उद्या पुन्हा अण्णांना भेटायला येईन, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. महाजनांना अण्णांचं मुख्यमंत्र्यांशीही फोनवरुन बोलणं करुन दिलं.

“अण्णांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या आम्हाला मान्य आहेत. किंबहुना, अण्णांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागलेत”, असेही महाजन यांनी अण्णांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

अण्णांच्या समर्थनार्थ ग्रामस्थ रस्त्यावर, नगर-पुणे हायवे रोखला!

केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी आता राळेगणसिद्धीचे ग्रामस्थही रस्त्यावर उतरले आहेत. अण्णा हजारेंच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

अण्णांच्या उपोषणाचा 5 वा दिवस : आज काय झालं?

अण्णांचं उपोषण नेमकं कशासाठी सुरुय?

केंद्रात लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि अण्णांनी त्यांचं गाव राळेगणसिद्धीतून या उपोषणाला बुधवारी 30 जानेवारीपासून सुरुवात केली. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनानंतर 2013 साली तत्कालीन यूपीए सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. केंद्र सरकारकडून लोकपालच्या नियुक्तीसाठी पॅनलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनलकडून लोकपाल कुणाला नियुक्त करायचं त्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि त्यानंतर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश (किंवा सरन्यायाधीशांनी नियुक्त केलेले न्यायमूर्ती) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांच्या उच्चस्तरीय समितीकडून लोकपालची नियुक्ती केली जाईल.

लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात आंदोलन करत आहेत.

जनलोकपालची वैशिष्ट्ये काय?

राज्य स्तरावर लोकायुक्त, तर केंद्रात लोकपाल असेल

सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोगा याप्रमाणेच ही स्वायत्त संस्था असेल, ज्यात कुणीही मंत्री किंवा अधिकारी हस्तक्षेप करु शकत नाही.

भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत यासाठी तरतूद आहे. जास्तीत जास्त एका वर्षात चौकशी आणि त्यापुढील जास्तीत जास्त एका वर्षात सुनावणी अशी प्रक्रिया असेल. म्हणजे एकूण दोन वर्षांच्या आत भ्रष्टाचार प्रकरणाचा निपटारा होईल.

भ्रष्ट व्यक्तीमुळे सरकारला जे नुकसान झालंय, ते शिक्षा सुनावतानाच भरुन घेतलं जाईल.

कुठे निधीचा दुरुपयोग केल्याचं दिसलं, रेशन कार्ड मिळालं नाही, पासपोर्ट संबंधी तक्रार असेल, पोलीस तक्रार घेत नसतील, खराब दर्जाचा रस्ता बनवला असेल अशा विविध प्रकरणांची तक्रार लोकपाल किंवा लोकायुक्तांकडे करता येईल.

योग्य व्यक्तीची लोकपाल म्हणून नेमणूक व्हावी यासाठी नियुक्ती थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून होईल. या प्रक्रियेत अत्यंत पारदर्शीपणा ठेवण्याची तरतूद कायद्यात आहे.

केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीआय यांसारख्या संस्थाही लोकपालच्या कक्षेत येतील.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना संरक्षण देणं लोकपालची जबाबदारी असेल.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा