राज ठाकरे 1 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, बाळासाहेबांच्या जयंती दिनी मनसेचे महाअधिवेशन

राज ठाकरे 1 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, बाळासाहेबांच्या जयंती दिनी मनसेचे महाअधिवेशन

मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते सहभागी होती असा अंदाज वर्तवला जात (MNS Special Session in Mumbai)  आहे.

Namrata Patil

|

Dec 20, 2019 | 7:28 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पराभवाची धूळ झटकून नव्या जोमाने कामाला लागले (MNS Special Session in Mumbai)  आहेत. राज ठाकरे हे नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी 23 जानेवारीला मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. नेमकं याच दिवशी राज ठाकरे यांनी मनसेचं महाअधिवेशन आयोजित केल्याने, मनसैनिकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

मनसेचे हे पहिले महाअधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील पदाधिकारी शिबिरात याबाबतची घोषणा करण्यात आली. मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते सहभागी होती असा अंदाज वर्तवला जात (MNS Special Session in Mumbai)  आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी रोजी जन्मदिवस आहे. यानिमित्ताने राज ठाकरे मुंबईत महाअधिवेशन घेणार आहेत. या दिवशी पक्षाचे महाअधिवेशन आयोजित करण्यामागे राज ठाकरे यांचा हेतू काय? पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. तसेच पक्षाच्या 13 वर्षांच्या वाटचालीतील हे पहिलं महाअधिवेशन आहे.

नुकतंच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी आणि इतरही विषयांबाबत चर्चा करण्यासाठी संवाद शिबीर आयोजित केलं होतं. पुण्यात मनसेचे हे दोन दिवसीय पदाधिकारी शिबीर सुरु आहे. या शिबिरात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं. महाविकासआघाडी सरकार राजकीय आणि पक्षाच्या परिस्थितीवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

या शिबिरात उद्या राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर भाषण करणार आहे. तसेत CAB आणि NRC कायद्यावर राज ठाकरे भाषणात भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जात (MNS Special Session in Mumbai)  आहे.

विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच दिवसापासून म्हणजे 1 जानेवारीपासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. 1 जानेवारी ते 22 जानेवारी पासून राज ठाकरेंचा हा राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला टप्पा असणार आहे. तर महाअधिवेशनानंतर या दौऱ्याचा दुसरा टप्पा पार पडेल, असेही बोललं जातं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें