AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या पुढच्या वेळी मिसेसना घेऊन या, चंद्रकांतदादा म्हणतात…

नाशिकमध्ये अचानक झालेल्या भेटीनंतर राज ठाकरे-चंद्रकांत पाटलांची काही दिवसातील ही दुसरी भेट होती. पुढच्या वेळी पत्नीलाही सोबत आणा, असं निमंत्रण राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी चंद्रकांतदादांना दिलं.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या पुढच्या वेळी मिसेसना घेऊन या, चंद्रकांतदादा म्हणतात...
Chandrakant Patil, Raj Thackeray, Sharmila Thackeray
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 06, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. “वहिनी (राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे) जेव्हा आल्या, त्या म्हणाल्या पुढल्या वेळी पत्नीला घेऊन या, मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर त्यांचं ऑफिस आहे. त्याही येतील” असं चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर सांगितलं. नाशिकमध्ये अचानक झालेल्या भेटीनंतर राज ठाकरे-चंद्रकांत पाटलांची काही दिवसातील ही दुसरी भेट होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“ज्यावेळी मी सिद्धार्थमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो, तेव्हापासूनच माझ्या मनामध्ये राज ठाकरेंबद्दल अॅट्रॅक्शन होतं. व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसण्यापुरती नाही, तर बोलणं, बोलण्यातील स्पष्टता, आपल्या मुद्द्यांवर आग्रही राहणं, फ्लेक्जिबल आहेत, पण थोडे रिजीडही आहेत ते, व्यक्ती म्हणून एकमेकाचं सुख पाहणं, यश पाहणं, हा भाग आहेच. पण तुमची भूमिका जरा बदला की हो, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजेत, मनसेचं इन्फ्रास्ट्रक्चर, या आधारे व्हाल तुम्ही महाराष्ट्राचे नेते, पण याला वेळ लागेल. मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, मोठ्या भूमिकेत तुम्ही यायला पाहिजे, हे एक माणूस म्हणून सांगणं वेगळं, पण मी भाजपचा राज्याचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही” असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील काय काय म्हणाले?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज साहेब ठाकरे यांची माझी नाशिकला अचानक भेट झाली. तेही प्रवासात होते, मीही प्रवासात होतो. त्यावेळी आमचं बोलणं झालं, मुंबईत केव्हातरी घरी भेटूया. कुठल्याही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, घरी बोलावणं.. पहिला प्रश्न आहे भाजप महाराष्ट्र अध्यक्ष राजसाहेबांच्या घरी का गेले, भाजप प्रदेश कार्यालयात का गेले नाहीत, मुळात मी असा अहंकार बाळगणारा नाही. भाजपचीच नाही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, कोणी घरी बोलावलं तर येतो म्हणणं. त्यांच्या निमंत्रणाचं स्वीकार करुन मी घरी आलो.. दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच, ती झाली. परंतु भाजप-मनसे युतीचा प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, हा विषय होता. मनसे आणि राज ठाकरेंनी परप्रांतीयांची भूमिका बदलल्याशिवाय आम्ही चर्चाही करु शकत नाही. त्यांनी एक क्लिप मला भाषणाची दिली होती. यूपीमध्ये भाषण व्हायरल झालं होतं. ते मी ऐकलं. त्यावर चर्चा झाली. सदिच्छा भेट झाली, राजकीय चर्चा असेल तर ती युतीची नाही, एकमेकांच्या भूमिकांची झाली” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. मी सिद्धार्थमध्ये विद्यार्थी परिषदेत होतो. तेव्हा हे BVS चे काम करायचं. तेव्हापासून माझ्या मनात यांच्याबद्दल आकर्षण होतं, व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आहेच. राज ठाकरेंना भूमिका बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते व्हायला हवे हे मी माणूस म्हणून सांगणं वेगळं, सध्या मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव नाही प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला तेही जातात, मीही जातो, आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली” असंही ते म्हणाले.

“राजसाहेब म्हणाले, यूपीतील माणसाला यूपीमध्ये 80 टक्के नोकऱ्या हव्या, हे मी यूपीत जाऊन म्हणेन, तसंच मी महाराष्ट्रातील मराठी मुलांना इथेच रोजगार मिळायला हवा, यात गैर काय? कुठलीही दोन महाराष्ट्रातील हिंदू माणसं भेटतात, तेव्हा निघाताना पुन्हा या असं सांगणं असतंच, या पुन्हा भेटीला राजकीय संदर्भ नाही, विशेषता वहिनी जेव्हा आल्या त्या म्हणाल्या पुढल्यावेळी पत्नीला घेऊन या असं म्हटलं, मी त्यांना सांगितलं इथून 50 पावलांवर त्यांचं ऑफिस आहे. त्याही येतील” असं चंद्रकांतदादांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंबद्दल तेव्हापासूनच अट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी, फक्त दिसणंच नाही… : चंद्रकांत पाटील

राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली