Maharashtra politics : कुठे गंगू तेली अन् कुठे राजा भोज; उद्धव ठाकरेंची कोणीच बरोबरी करू शकत नाही, राजन साळवींचा सोमय्यांना टोला
शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली असे म्हणत त्यांनी सोमय्यांवर निशाणा साधला.

रत्नागिरी : शिवसेना (shiv sena) उपनेते आणि आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माफिया मुख्यमंत्री हटविल्याबद्दल अभिनंदन असे ट्विट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले होते. यावरून आता राजन साळवी यांनी सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणीच बरोबरी करू शकत नाही असे म्हणत साळवी यांनी सोमय्यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच किरीट सोमय्या यांना कोकणात पाऊल देखील ठेवू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर निवडणुकीबाबत कोणताही दबाव नसून, ते म्हणतील त्याच उमेदवाराला मतदान करणार असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे.
साळवी यांनी नेमकं काय म्हटलं?
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. माफीया मुख्यमंत्री हटवल्याबद्दल अभिनंदन असे ट्विट सोमय्या यांनी केले होते. या ट्विटला साळवी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुठे गंगु तेली आणि कुठे राजा भोज, उद्धव ठाकरे यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही म्हणत त्यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर देखील आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते जे म्हणतील त्याच उमेदवाराला मतदान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र त्यांची ती मागणी वैयक्तिक असल्याचे देखील साळवी यांनी म्हटले आहे.
गावित यांचे उद्धव ठाकरेंना पत्र
दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे पालघर लोकसभा मतदारसंंघाचे खासदार गावित यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी केली आहे. भाजपाकडून प्रथमच आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी गावित यांनी केली आहे. त्यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांना एक पत्र देखील पाठवले आहे.
