Ravindra Dhangekar: पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, ही लोक फसवणार… शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी बॉम्ब टाकला, भाजपवर मोठी आगपाखड, वाद पेटणार?
Pune Big News: पुण्यात महायुतीत मिठाचा खडा पडला. भाजप आणि शिवसेना युती होऊ शकली नाही. त्यानंतर आता शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पहिला बॉम्ब टाकला. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. धंगेकर यांनी भाजपवर मोठी आगपाखड केल्यानंतर आता अजून एका वादाला फोडणी मिळाली आहे.

Ravindra Dhangekar Big Allegaion on BJP: “मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं ही लोक शिवसेनेला फसवणार आहेत. मी आमच्या लोकांना सांगत होतो ते युती करणार नाहीत. त्यांना वाटत होतं की आम्हीच पुण्यातले कोणीतरी मोठे आहोत यामध्ये ते वावरत होते. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये आम्हाला एबी फॉर्म पोहोचवायला सुद्धा वेळ मिळाला नाही.एवढं गाफील त्यांनी आम्हाला ठेवलं. ते विश्वासाला पात्र राहिले नाहीत.दुःख याचा आहे की आमचे कार्यकर्ते गाफिल राहिले. यामुळे आम्हाला 165 उमेदवार उभे करता आले नाहीत मात्र 110 उमेदवार आमचे रिंगणात आहेत”, असा गंभीर आरोप शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर केला आहे. यावरच न थांबता त्यांनी पुढे जा बॉम्ब टाकला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.
शहर भाजपचं नेतृत्व मंगळसूत्र चोराकडे
महायुती होणार असं वाटताना अखेरच्या क्षणात भाजप आणि शिंदे सेनेचं काही जुळलं नाही. भाजप कमी जागा देत असल्याने आणि अनेक ठिकाणी सन्मानजनक तोडगा न निघाल्याचा आरोप करत शिंदे सेनेने युतीत फारकत घेतली आणि स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले. त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांविरोधातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी तर भाजपविरोधात मोर्चाच उघडला आहे.
पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व मंगळसूत्र चोर करत आहेत हे पुणेकरांचे दु:ख आहे, असा बॉम्ब त्यांनी टाकला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फसवल्याचा आरोप धंगेकरांनी केला. मंगळसूत्र चोराचे नेतृत्व पुणेकर कधी मान्य करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्ता संपत चाललेला आहे. भाजपमध्ये आयात लोक घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.नेतृत्व करणारा जर कोण पक्ष असेल तर तो शिवसेनाच आहे, असा दावा त्यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्षांबाबत काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण हे राज्याचे नेते आहेत, आपण त्यांच्यावरती काय बोलणार मात्र ते सत्तेसाठी काही करू शकतात, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.पुणे शहर आणि आम्ही 16 तारखेला एकनाथ शिंदे यांना आम्ही चांगली भेट देऊ मला विश्वास आहे, असे ते म्हणाले. यावेळी अजित पवारांचं कौतुकही त्यांनी केलं. तर भाजपनं ज्यांच्या हातात पुण्याचे नेतृत्व दिले ते मंगळसूत्र चोर आहेत. मंगळसूत्र चोराच्या डोक्यात पैसे खाणं आणि भ्रष्टाचार करणे असा आरोपही त्यांनी केला.
