AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टी आक्रमक; म्हणाले पन्नास हजार पन्नास खोक्यांपुढे कमीच

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे. यावरून राजू शेट्टी यांनी सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अब्दुल सत्तारांच्या 'त्या' वक्तव्यावरून राजू शेट्टी आक्रमक; म्हणाले पन्नास हजार पन्नास खोक्यांपुढे कमीच
Image Credit source: tv9
| Updated on: Oct 23, 2022 | 10:36 AM
Share

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून  शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हटलं राजू शेट्टी यांनी?

राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे कृषीमंत्री म्हणतात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. 20 गुंठे जमीन असणाऱ्या एका छोट्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हे डोंगराएवढेच असतात. त्याला एक रुपया गाडीच्या चाका एवढा असतो. मात्र हे पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी काय म्हटलं?

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला बसला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. आम्ही पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.