Rajyasabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या शर्यतीत बंजारा समाजही, संजय राठोडांना मंत्रिंडळात घ्या किंवा आम्हाला उमेदवारी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्री क्षेत्र पोहरादेवीचे महंत सुनील महाराज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपली वर्णी लावून बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्या अशी मागणी महंत सुनील महाराज यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.

Rajyasabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या शर्यतीत बंजारा समाजही, संजय राठोडांना मंत्रिंडळात घ्या किंवा आम्हाला उमेदवारी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या शर्यतीत बंजारा समाजही, संजय राठोडांना मंत्रिंडळात घ्या किंवा आम्हाला उमेदवारी द्या, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

May 22, 2022 | 4:28 PM

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या (Rajyasabha Election) जागेसाठी चुरस आता चांगलीच वाढली आहे. संभाजीराजेंच्या (Chatrapati Sambhajiraje)  उमेवारीमुळे या जागेचा सस्पेन्स आधीच वाढला असताना आता या शर्यतीत बंजारा समाजही (Banjara) उतरला आहे. श्री क्षेत्र पोहरादेवीचे महंत सुनील महाराज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपली वर्णी लावून बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्या अशी मागणी महंत सुनील महाराज यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे. तसेच त्यांनी दोन पर्याय दिले आहेत, सुनील महंत यांची राज्यसभेवर वर्णी लावा किंवा संजय राठोड यांचे मंत्री मंडळात पुनर्वसन करा, अशी भूमिका आता बंजारा समाजाने घेतली आहे. तर छत्रपती संभाजी राजे (Chatrapati Sambhajiraje) यांच्याविषयी पूर्ण आदर आहे, मात्र त्यांची पुढल्या वेळीही राज्यसभेवर वर्णी लागू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यसभेसाठी मी शिवसेनेत प्रवेश करायला तयार आहे, असेही महंत सुनील महाराज यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्रांचा शिवबंधन बांधण्यासाठी निरोप

तर दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातही या निवडणुकीवरून हलचालींनी वेग आलाय. उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यास ‘वर्षा’वर या असा निरोप मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खासदार अनिल देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी छत्रपती संभाजी यांची भेट घेऊन हा निरोप दिल्याचीही माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचाही छत्रपतींना फोन झाला आहे.

फक्त पुरस्कृत उमेदवार घोषित करा

मात्र संभाजीराजे यांनी या प्रस्तावर सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. कारण शिवसेनेत प्रवेश करा या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला आहे. मात्र मला शिवसेना पुरस्कृत उमेदवार घोषित करा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रंगत वाढली आहे.

सेना कुणाला संधी देणार?

या जागेच्या शर्यतीत संभाजीराजे आधीच होते मात्र आता बंजारा समाजही उतरल्याने शिवसेनेपुढेही मोठा पेच तयार होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेना मंत्री संजय राठोड यांना एका प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना कॅबिनेटमध्ये घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आता तर बंजारा समाजाने दोन पर्याय ठेवल्याने शिवेसना कोणता पर्याय स्वीकरणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें