Narayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे, अशी माहिती नारायण राणेंनी ट्विटरवरुन दिली

Narayan Rane | खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग झालेले राणे कुटुंबातील ते दुसरे सदस्य ठरले आहेत. (Rajyasabha MP Narayan Rane tested Corona Positive)

“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी” असे आवाहन नारायण राणे यांनी ट्विटरवरुन केले आहे. लवकरच लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असेही त्यांनी सांगितले.

नारायण राणे यांचा परिचय

  • नारायण राणे हे भाजपकडून राज्यसभा खासदार
  • सप्टेंबर 2017 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी
  • महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची 2018 मध्ये स्थापना करुन भाजपला पाठिंबा
  • ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन
  • शिवसेनेकडून 1999 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान
  • शिवसेनेने 2005 मध्ये बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये

(Rajyasabha MP Narayan Rane tested Corona Positive)

दरम्यान, नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांना 16 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. मुंबईतच ते सेल्फ क्वारंटान होते. “कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असं ट्विट 16 ऑगस्टला निलेश राणे यांनी केलं होतं.

निलेश राणे यांनी 29 ऑगस्टला कोरोनावर मात केली. त्यांनी स्वत: ट्विट करुन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले होते.

संबंधित बातम्या :

माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, शुभेच्छा देणाऱ्यांचा मनापासून आभारी : निलेश राणे

सिंधुदुर्गातील कट्टर राणे समर्थकाचे निधन, कोरोना संसर्गानंतर अखेरचा श्वास

(Rajyasabha MP Narayan Rane tested Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *