AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख भाजपकडून नाही, रक्षा खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांशी चर्चा

हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल" अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी दिली. (Raksha Khadse derogatory BJP website)

वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख भाजपकडून नाही, रक्षा खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांशी चर्चा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 28, 2021 | 12:56 PM
Share

जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. “आपण पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झाला नाही” असं स्पष्टीकरण खुद्द रक्षा खडसे यांनी दिलं आहे. (Raksha Khadse reacts on derogatory reference on BJP official website)

“भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेला प्रकाराची माहिती मला काल संध्याकाळी झाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी दिली.

रक्षा खडसे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या संकेतस्थळावर झालेल्या चुकीच्या प्रकाराबाबत आपले मत मांडले.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

“भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर या विषयाबाबत मी तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही. माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आले, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ म्हणून असलेल्या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे” असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

“भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल”, असं अनिल देशमुख ट्विटरवर म्हणाले आहेत.

रक्षा खडसेंबाबत खरंच अपमानास्पद शब्द?

दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्याबाबत अजूनही असा काही उल्लेख आहे का? याची शाहनिशा करण्यासाठी आम्ही याबाबत पडताळणी केली. मात्र, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला तसा काही उल्लेख आढळला नाही. कदाचित स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर बदल करण्यात आल्याची शक्यता आहे किंवा दुसरं काही कारण असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा

(Raksha Khadse reacts on derogatory reference on BJP official website)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट