जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा, राम कदम सेनेवर बरसले

जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर तुटून पडले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:00 PM, 4 Mar 2021
जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा, राम कदम सेनेवर बरसले
ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि राम कदम

मुंबई :  जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवसेनेवर तुटून पडले. बंगालच्या निवडणुकीत स्वत: न उतरता ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांच्या तृणमुलला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर राम कदम यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं. (Ram kadam Attacked Shivsena over West bengal Election)

शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं, त्यांना त्यांची औकात कळेल

बंगालच्या निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, असा सवाल करताना शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल, अशी जहरी टीका राम कदम यांनी केली.

शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचवता आलेलं नाही

शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. त्यातून धडा घेत त्यांनी बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतल्याचा टोला राम कदम यांनी लगावला. तसंच जरी शिवसेना बंगालमध्ये लढली तरी देखील एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचवू शकणार नाही, असं म्हणत राम कदम यांनी सेनेला डिवचलं.

ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना सेनेचा पाठिंबा

शिवसेनेने तृणमूलला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर राम कदम यांनी सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, असं राम कदम म्हणाले.

 जय श्रीराम नाऱ्यापासून पळणाऱ्या दीदींना सेनेचा पाठिंबा, खासदार मनोज कोटक यांची टीका

बिहारमध्ये ऑलिम्पिक स्तरावर डिपाॅझिट जप्त करून घेतल्यानंतर शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवत नाहीये. जय श्री राम नाऱ्यापासून पळणाऱ्या दीदींना पूर्ण पाठिंबा देतेय. शिवसेना हिंदुत्वापासून खूप दूर गेलीये. मोदीविरोधी आता रामविरोधी झाले आहेत, अशी टीका भाजप खासदार मनोज कोटक यांनी केली

शिवसेना बंगालच्या मैदानात उतरणार नाही, संजय राऊतांचं ट्विट

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरवरुन यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पाठिंबा देत असल्याचं राऊतांनी सांगितलं. ममतादीदी बंगालची वाघीण असल्याचा गौरवही संजय राऊतांनी केला.

“शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

हे ही वाचा :

ममतादीदी बंगालची वाघीण, शिवसेनेचा तृणमूलला पाठिंबा, पश्चिम बंगालच्या मैदानात न उतरण्याची घोषणा