अमिताभ बच्चन, अक्षय कुमारला दिवसाढवळ्या धमकी, काँग्रेसला झालंय तरी काय? : राम कदम

काँग्रेस पक्षाचे नेते दिवसाढवळ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार अशा सिनेतारकांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय? असा सवाल राम कदम यांनी केला. (Ram Kadam Nana Patole)

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारला दिवसाढवळ्या धमकी, काँग्रेसला झालंय तरी काय? :  राम कदम
राम कदम आणि नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 2:51 PM

मुंबई : “काँग्रेस पक्षाचे नेते दिवसाढवळ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार अशा सिनेतारकांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय?,” असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसला केला. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्याविषयी बोलताना काँग्रसेचे नविर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अमिताभ, अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असून त्यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण होऊ देणार नाही, असा इशारा पटोले दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राम शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. (Ram Kadam criticizes Nana Patole and congress for commenting on Amitabh Bacchan And Akshay Kumar)

“राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय? असे असले तरी देशाचे बाजूने जो कोणी बोलेल, त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे,” असे राम कदम म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले?

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बोलताना नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर टीका केली. अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही. तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही,” असेही नाना पटोले म्हणाले.

टीव टीव करणारे गप्प का?

दरम्यान,  यापूर्वी 17 जानेवारी रोजी इंधन दरवाढीवर बोलताना नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी लक्ष्य केले होते.  देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यांनतर आता नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण न होऊ देण्यचा इशारा दिला.

इतर बातम्या :

आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का?; नाना पटोलेंचा सवाल

…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला

(Ram Kadam criticizes Nana Patole and congress for commenting on Amitabh Bacchan And Akshay Kumar)

Non Stop LIVE Update
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.