ते सारखं म्हणतात खोके…. विरोधकांच्या टीकेला खास रामदास आठवले स्टाइल उत्तर, पाहा Video

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्रीदेखील उपस्थित होते. रामदास आठवले यांच्या खुसखुशीत कवितांचा सर्वांनीच आस्वाद घेतला.

ते सारखं म्हणतात खोके.... विरोधकांच्या टीकेला खास रामदास आठवले स्टाइल उत्तर, पाहा Video
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 9:32 AM

मुंबईः आपल्या खास शैलीने विरोधकांवर आणि राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काल एका कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्ताधाऱ्यांवर सातत्याने खोके सरकार असा आरोप करते. रामदास आठवले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. ते सारखं म्हणतात खोके, त्यांचं बिघडलेलं आहे का डोके? अशी शीघ्र कविता आठवले यांनी केली आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुंबईत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्रीदेखील उपस्थित होते. रामदास आठवले यांच्या खुसखुशीत कवितांचा सर्वांनीच आस्वाद घेतला.

रामदास आठवले यांच्या काही खास कविता-

खासदार श्रीकांत शिंदे आहेत आरोग्याच्या कामात दक्ष म्हणूनच एकनाथ शिंदेंचं आहे साऱ्या महाराष्ट्रात लक्ष

जे बाळासाहेबांचे सच्चे आहेत बंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे

आरोग्याचे जे राहिले नाहीत अंधे ते तरूण नेते आहेत, श्रीकांत शिंदे

मी इथे आलो आहे, महाविकास आघाडीला इंजक्शन देण्यासाठी म्हणूनच मी राहणार आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींच्या पाठी

शिवरायांच्या आणि भीमरायांच्या विचारांच्या आहेत आपल्या मनात गाठी म्हणूनच मी घेतलेली आहे माझ्या हातात त्यांच्यासाठी काठी

मी २०२० ला गेट वे ऑफ इंडियाजवळ घोषणा केली होती, गो कोरोना गो… त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गो महाविकास आघाडी गो महाविकास आघाडी..

माझा आवाज सगळ्या जगात गेला. मलाही एकनाथ शिंदेंसारखी लोकांमध्ये राहण्याची सवय आहे. कोरोना गो म्हणाल्यानंतर माझ्याच मागे कोरोना लागला. मी ११ दिवस अॅडमिट होतो तरी माझं मीठ खाणं बंद नव्हतं… ११ दिवसात माझा कोरोना गेला. माझ्या मनात होतं महाविकास आघाडी जात नाही, असं का होतंय, असा विचार माझ्या मनात होता. उद्धवजी आणि माझे संबंध अत्यंत चांगले होते. पण आधी माझे संबंध बिघडले आणि नंतर एकनाथ शिंदे यांचे संबंध बिघडले…

एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘ जी भूमिका तुमच्या पक्षाला मान्य नव्हती, त्यावेळेपासूनच एकनाथ शिंदेंच्या मनात होतं. आमच्याही मनात होतं. एकनाथ शिंदे यांनी लवकर बाहेर यावं वाटत होतं… पण ४० जोडणी होईपर्यंत बाहेर आले असते तर…. त्यांनाच बाहेर रहावं लागलं असतं..

प्लॅनिंग करण्यात ते एकदम हुशार आहेत. त्यांच्याकडे राहिले फक्त 15 आणि आता म्हणतायत आमचं राज्य येणार… आम्ही इथं असताना कसे येतील, आम्ही काय गोट्या खेळतोय का? एवढं लोकांना औषध देतोय, सेवा करतोय.. ते वाया जाणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.