AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीला दे धक्का! रामराजे निंबाळकर भाजपच्या मार्गावर

उदयनराजेंसोबत खटके उडाल्यानंतर नाराज असलेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे निंबाळकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच ते भाजप प्रवेश करण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादीला दे धक्का! रामराजे निंबाळकर भाजपच्या मार्गावर
| Updated on: Aug 19, 2019 | 11:45 AM
Share

मुंबई : भाजपमध्ये मेगाभरतीचं दुसरं पर्व सुरु होण्याचे संकेत प्रसाद लाड यांनी दिल्यानंतर काही तासातच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) भाजपचा झेंडा हाती धरण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

रामराजे निंबाळकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र दोघांमध्ये असलेल्या मतभेदांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तोडगा काढता न आल्याने रामराजे निंबाळकर गेल्या काही काळापासून नाराज आहेत. त्यामुळे निंबाळकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

तीन जागांची मागणी

रामराजे निंबाळकरांनी भाजपकडे विधानसभेच्या तीन मतदारसंघांची मागणी केल्याचं म्हटलं जातं. मुंबईतील कुलाबा हा मतदारसंघ जावयासाठी निंबाळकरांनी मागितला, मात्र तो आमदार राज पुरोहित यांचा मतदारसंघ असल्यामुळे भाजप तो सोडण्याची चिन्हं कमी आहेत. मात्र साताऱ्यातील फलटण आणि वाई या मतदारसंघांची बिदागी रामराजेंना दिली जाऊ शकते. पक्षांतरानंतरही विधानपरिषदेचं सभापतीपद निंबाळकरांकडे राहण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून रामराजे नाईक निंबाळकरांना ओळखलं जातं. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कातील राष्ट्रवादीचा मोहरा भाजपात गेला, तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात भुईसपाट होईल, असेच अंदाज लावले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच रामराजे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा होत्या.

निंबाळकर विरुद्ध भोसले

रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले सार्वजनिक कार्यक्रमांमधून एकमेकांवर उघड टीका करत राहिले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निरा-देवघर पाणी प्रश्नावर शासनाने काढलेला अध्यादेश उशिरा काढल्याचे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. यावर रामराजेंनी प्रत्युत्तर देताना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा उदयनराजेंना दिली होती. याचबरोबर रामराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा नाहीतर आम्हाला पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करा, असं सूचक विधान केल होतं.

शिवेंद्रराजेंपाठोपाठ रामराजे

यापूर्वी उदयनराजे भोसलेंचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सातारा जिल्ह्यातील उदयनराजे यांचं वाढतं प्रस्थ पाहता भाजपने छत्रपतींच्या घराण्यातील वारसदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

भाजपमध्ये मेगाभरती

शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या वेळी सुजय विखे पाटील आणि त्यानंतर काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला आहे.

संबंधित बातम्या 

..तर रामराजेंची जीभ हासडली असती, पवारांसोबतच्या बैठकीतून बाहेर येताच उदयनराजे आक्रमक

आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना  

“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.