ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अॅड जयश्री पाटील यांनी आरोप केला आहे. जयश्री पाटील यांनी केवळ आरोपच केला नाही तर याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अॅड जयश्री पाटील (Jayshree patil) यांनी आरोप केला आहे. जयश्री पाटील यांनी केवळ आरोपच केला नाही तर याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय म्हणाल्या जयश्री पाटील
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आले. हा अचारसंहितेचा भंग ठरत असल्याचे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. याविरोधता जयश्री पाटील यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
तक्रारदार जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. त्याबाबत माझा काहीच आक्षेप नाही. मात्र प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी सलामी दिली नाही. त्यांना सविधान मान्य नाही का असा सवाल जयश्री पाटील यांनी उपस्थित केला आहे. यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
संबंधित बातम्या
इंदापूर काँग्रेस भवनावर नेमका ताबा कुणाचा? काँग्रेस विरुद्ध हर्षवर्धन पाटील वाद पेटला
Pankaja Munde : केज नगरपंचायतीत पंकजांचा धनंजय मुंडेंना चेकमेट, धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?