धानोरकरांना तिकीट ते विखे-थोरात वाद, काँग्रेसमधील धुसफुशीची 7 कारणे

मुंबई: काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा लोकसभा उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीचा नको तितका हस्तक्षेप वाढल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढतोय. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वानं गंभीर दखल घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाअंतर्गत कलह संपता संपत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पक्षावरची मजबूत कमांड कमी झाली […]

धानोरकरांना तिकीट ते विखे-थोरात वाद, काँग्रेसमधील धुसफुशीची 7 कारणे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा लोकसभा उमेदवारीचा घोळ, राष्ट्रवादीचा नको तितका हस्तक्षेप वाढल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढतोय. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वानं गंभीर दखल घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाअंतर्गत कलह संपता संपत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पक्षावरची मजबूत कमांड कमी झाली म्हणून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीतून नेत्यांना मुंबईत यावं लागलं. या नेत्यांनी काँग्रेसमधला कलह कमी करण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.

दिल्लीतून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी के सी वेण्णूगोपाल आणि नव नियुक्त महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक मधुसुदन मिस्त्री मुंबईत आले. त्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. पण निवडणूक दृष्टीकोनातून ही बैठक असल्याचं सांगण्यात आलं.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात धुसफूस का आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.

  1. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून बाळू धानोरकर या आयात उमेदवाराला तिकीट दिलं
  2. सांगलीची जागा काँग्रेसची असताना ती सोडत स्वाभिमान पक्षाला दिली, त्यामुळं वसंतदादा पाटील कुटुंब नाराज झालं
  3. पुणे लोकसभा उमेदवारीत शरद पवार यांच्या आग्रहावरून काँग्रेस पक्षावर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाच काँग्रेस पक्षात प्रवेश दिला
  4. लातूरमध्ये अमित देशमुख यांची विनंती धुडकावत मच्छिंद्रचंद्र कामत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे देशमुख नाराज झाले
  5. रणजित निंबाळकर यांनी सातारा जिल्हाध्यक्ष पद सोडून भाजपात प्रवेश करत थेट उमेदवारी मिळवली
  6. नगर लोकसभा जागेवरुन विखे, तर औरंगाबाद लोकसभा जागेवरुन अब्दुल सत्तार नाराज झाले
  7. नगरमध्ये विखे-थोरात वाद थांबवण्यात अपयश आलं. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो.

काँग्रेसचा निवडणुकीत आक्रमक पवित्रा दिसायला हवा होता, तो त्या तुलनेनं दिसत नाही. त्यामुळे आधीच पक्षात मरगळ आली की काय असं वाटू लागलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी प्रचारात आघाडीवर असताना, काँग्रेस मात्र बँकफूटवर आहे. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाची दखल महत्त्वाची ठरत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.