AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार आमच्या संपर्कात, आधी बोलू, नंतरच… संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut: शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांनी बंडखोर खासदार आमच्या संपर्कात आहेत असे म्हटले आहे.

सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार आमच्या संपर्कात, आधी बोलू, नंतरच... संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
संजय राऊतImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 10:43 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करणार असल्याचे म्हटले जात आहे. हे सहा खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाची काय भूमिका असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेत आहे. ओम बिर्ला यांच्याकडून कोणतेही अधिकृत निर्देश नाही. ज्या गटात जाणार आहे, असं सांगितलं जात आहे, त्या मिंधे गटाने चार पाच खासदार येणार हे विधान आलं नाही. शिवसेना सोडली असं या खासदारांनी जाहीर केलं नाही. ते व्हिपचं उल्लंघन करून बैठकीला हजर राहिले नाही. त्याबद्दल कारवाई सुरू आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार संपर्कात आहे. मतदारसंघात जायला त्यांना भीती वाटते. लोकांचा रोष आहे. खासदार म्हणतात आम्ही शिवसेनेत आहोत. काही गैरसमज होत आहे. अशा खासदारांशी चर्चा करणं स्वाभाविक आहे. ज्या क्षणी सांगतील शिवसेना सोडतील. तेव्हा संबंध तोडू. आज उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत येऊन मेळावे घेणार आहे. त्यानंतर २७ ते २९ तारखेला या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाणार आहे. नागपूर यवतमाळपासून दौरा सुरू होईल. तो शिर्डीला संपणार आहे. मराठवाड्यात जाणार आहे. ही एक प्रक्रिया आहे. त्यात धाराशिव, हिंगोली, परभणी आहे. या सर्व मतदारसंघात जाणार आहे.

“अमित शाहा हे व्यापारी”

पुढे ते म्हणाले, अमित शाहा हे व्यापारी आहे. शेअरमध्ये पैसा गुंतवणे आणि कुत्रिम भाव वाढवून पैसा कमावणे हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे,. बाकी सहकार हे ढोंग आहे. त्यांनी या देशात अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतली. कुणाची घेतली हे भविष्यातील काळ ठरवेल. खासदार, प्रादेशिक पक्ष फोडून भविष्यात मोदींना आव्हान देण्याचं षडयंत्र आहे. मोदींना आव्हान देण्याच्या षडयंत्रात एकनाथ शिंदेंना शामिल करून घेतले. या खासदारांच्या विरोधात उद्या शाह मोदींविरोधात बंड करून घेऊ शकतात.

एकनाथ शिंदे ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. त्यांच्या सेनेला चार वर्ष झाली. सुप्रीम कोर्ट चार वर्ष निर्णय देऊ शकला नाही. तुमच्या दबावामुळे. सुप्रीम कोर्टाचा अधिकार घेऊन शिवसेना कोणती हे तुम्ही सांगितलं. यावरून सुप्रीम कोर्ट तुमच्या दबावामुळे कोर्ट निर्णय देत नाही. आयोगाने त्यांना चिन्ह दिलं. काल ते म्हणाले ते अमित शाहांच्या पोटातील विष ओठावर आलं. शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत हे अमित शाह यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा शाह यांनी शिंदेंना दिलं. अमित शाहांच्या नावानं टाळकुटेपणा करत असतील तर मराठी मातीशी गद्दारी करत आहेत असे ही संजय राऊत म्हणाले.

Follow Us
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!