सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी पोहचण्यासाठी मोठी मदत केली. (Rohit Pawar meets Sonu Sood)

सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप

मुंबई : स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी जाण्यासाठी मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनू सूदच्या कामाने भारावून गेलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्याची भेट घेतली. (Rohit Pawar meets Sonu Sood)

सोनू सूदने हजारो कामगारांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी मोठी मदत केली. गेले काही दिवस सोनू आणि त्याची टीम यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी सोनूची त्याच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली.

“तुम्हाला भेटून आनंद झाला भाऊ. चांगले काम चालू ठेवा. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी परिश्रम घेत राहीन” अशा शब्दात सोनूने रोहितचे आभार व्यक्त केले.

सोनूने घरी जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित व्यक्तींसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. सुरुवातीला तो केवळ बसने मजुरांना घरी पाठवत होता. मात्र आता परजिल्ह्यात किंवा परराज्यातील लांतरित व्यक्तींना ट्रेन आणि विमानाच्या माध्यमातूनही घरी पोहोचवत आहे. सोनूने आपल्याला किती वेगाने मदतीसाठी मेसेज येत आहेत, याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर शेअर केला होता. (Rohit Pawar meets Sonu Sood)

एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनूने 70 हजार जणांचे आपल्याला मदतीसाठी फोन आल्याचा दावा केला होता. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांना घरी पोहोचवण्यासाठी मदत करेन, असं त्याने आश्वस्त केलं होतं.

सोनूने लॉकडाऊनच्या काळात जवळपास 40 हजार जणांच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती आहे. तर निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतरही त्याने 28 हजार जणांना मदत केल्याचं म्हटलं जातं.

पाहा व्हिडीओ

(Rohit Pawar meets Sonu Sood)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *