Rohit Pawar : मोहित कंबोजच्या ट्विटला रोहीत पवारांचे सडेतोड उत्तर, ईडीच्या चौकशीबाबतही केला खुलासा…!

सोशल मिडीयाचा वापर हा प्रसिद्धीसाठी केला जात आहे. काहींना तर याचे व्यसनच जडले आहे. मला उद्देशून जे काही ट्विट झाले ते केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. तर आपल्याला कोणत्याही संस्थेची नोटीस आलेली नाही. प्रसिद्धीसाठी असले फंडे वापरले जात आहेत. संस्थाकडून होणारी चौकशी ही काही नवीन नाही तो एक प्रक्रियेचा भाग आहे.

Rohit Pawar : मोहित कंबोजच्या ट्विटला रोहीत पवारांचे सडेतोड उत्तर, ईडीच्या चौकशीबाबतही केला खुलासा...!
आ. रोहित पवार आणि मोहित कंबोज
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 7:31 PM

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून (Mohit Kamboj) मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन (Rohit Pawar) आ. रोहित पवार यांना लक्ष केले होते. त्यांच्या ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून झालेले व्यवहार आणि बॅंकांची फसवणूक हे समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावर रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. पण हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून तर लावलेच पण (ED Office) ईडीकडून अद्यापर्यंत काहीही विचारले गेलेले नाही तर कोणती चौकशीही झालेली नाही हे स्पष्ट केले. केवळ प्रसिद्धीसाठी हे ट्विट केले जात आहे. शिवाय कुणाच्या ट्विटला आणि मिडियाला उत्तर देण्यास आपण बांधिल नाही. आणि कंपनीची चौकशी हे काय नवीन नाही. गेल्या 7 वर्षात वेगवेगळ्या संस्थाकडून कंपनीची चौकशी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विचारणा झाली तर आपले सहकार्यच राहणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे कंबोज यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य हे पहावे लागणार आहे.

कोणतीही नोटीस नाही, सर्वकाही प्रसिद्धीसाठी

सोशल मिडीयाचा वापर हा प्रसिद्धीसाठी केला जात आहे. काहींना तर याचे व्यसनच जडले आहे. मला उद्देशून जे काही ट्विट झाले ते केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. तर आपल्याला कोणत्याही संस्थेची नोटीस आलेली नाही. प्रसिद्धीसाठी असले फंडे वापरले जात आहेत. संस्थाकडून होणारी चौकशी ही काही नवीन नाही तो एक प्रक्रियेचा भाग आहे. भविष्यात विचारणा झाली तर सहकार्य राहणारच असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कंबोज यांनी थेट नाव न घेता रोहित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्याला रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

7 वर्षात अनेकवेळा चौकशी

कंपनीची चौकशी हा रेग्युलरतेचे भाग आहे. त्यामुळे वेगळे काही होईल असे नाही. गेल्या 7 वर्षात ग्रीन एकर्स कंपनीची अनेकवेळा वेगवेगळ्या संस्थांकडून चौकशी झालेली आहे. त्यामध्ये गैर ते काय ? शिवाय भविष्यात जरी याबाबतीत विचारणा झाली तरी आपले सहकार्य राहणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. शिवाय त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला आपण बांधिलही नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

कंबोज यांचे काय आहेत आरोप?

ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे स्टार्टअप्स करण्यासाठी 2007 ते 2012 या कालावधीत घेण्यात आलेल्या कर्जातून बॅंकेचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही या बॅंकेने या गबरुला करोडो रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या पैशावर 50 कोटी रूपयांना कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने विकत घेतला आहे. तर याच कारखान्यावर पुन्हा 150 कोटींचे कर्ज घेतले गेल्याचा आरोप कंबोज यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर केला आहे. सबंध ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी गबरु जवान असाच उल्लेख केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.