खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही; आठवलेंचा दावा

खडसे एकटेच राष्ट्रवादीत जातील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत 15 आमदार जाणार नाहीत, असा दावा करतानाच त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाइंत यायला हवं होतं, असं रामदास आठवले म्हणाले.

खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही; आठवलेंचा दावा

बारामती: माझ्या संपर्कात 15-16 आमदार असल्याचा दावा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे करत असले तरी रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. खडसे एकटेच राष्ट्रवादीत जातील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत 15 आमदार जाणार नाहीत, असा दावा करतानाच त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाइंत यायला हवं होतं, असं रामदास आठवले म्हणाले. (rpi leader ramdas athawale reaction on eknath khadse’s ncp joining)

रामदास आठवले आज अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी खडसेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसेंसोबत 15-16 आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही, असं आठवले यांनी सांगितलं. खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाइं हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.

पूरग्रस्ताना केंद्रकडून मदत मिळणारच आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्याने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जीएसटीचे केंद्राकडे बाकी असलेले पैसे मिळतील, पण सद्यस्थितीबाबत सर्वांनी मिळून केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा, असंही ते म्हणाले.

15 आमदार सोबत असल्याचा खडसेंनी केला होता दावा

माझ्या संपर्कात भाजपचे 10-12 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असंही खडसे म्हणाले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दहा-बारा जणांवर गुन्हे होते. एका मंत्र्याचं प्रकरण तर सीबीआयकडे होतं. तरीही सर्वांना क्लिन चीट मिळाली. मग माझ्यावरच अन्याय का?, असा सवाल करतानाच मला क्लिन चीट द्यावी असं माझं म्हणणं नाही. पण माझा दोष काय? हे तरी मला सांगायला हवं ना. त्याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. (rpi leader ramdas athawale reaction on eknath khadse’s ncp joining)

संबंधित बातम्या:

10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?

पंकजा मुंडे आठ महिन्यांनी बीडला, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

खडसेंच्या अ‍ॅक्शनमुळे राष्ट्रवादीची चांदी, हळूहळू ‘असा’ लागेल भाजपच्या गडाला सुरूंग

(rpi leader ramdas athawale reaction on eknath khadse’s ncp joining)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI