रासप आमदार राहुल कुल यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, गडचिरोली, नांदेड आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बारामतीत पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनीही उपस्थिती लावली. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनीही भाजपचं उपरणं गळ्यात घालत या संवाद कार्यक्रमाला …

रासप आमदार राहुल कुल यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, गडचिरोली, नांदेड आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बारामतीत पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, खडकवासल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनीही उपस्थिती लावली. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनीही भाजपचं उपरणं गळ्यात घालत या संवाद कार्यक्रमाला हजेरी लावली.

इतकंच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळच्या आमदारांमध्ये समावेश असलेल्या राहुल कुल यांच्या भाजपच्या कार्यक्रमातील हजेरीमुळे येणार्‍या निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल का याबाबत चर्चांना आता उधाण आले आहे. एकीकडे लोकसभेसाठी आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच, राहुल कुल यांनी बारामतीत कार्यक्रमाला लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली.

राहुल कुल यांची पत्नीसाठी फिल्डिंग?

बारामतीतील मोरोपंत सभागृहात भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. राहुल कुल यांनीही मोदींशी बातचीत केली. दौंड विधानसभा मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध कामे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच विविध योजना चांगल्या पद्धतीने राबवून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याबद्दल राहुल कुल यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत तगडा उमेदवार मिळवण्यासाठी भाजपची तारेवरची कसरत सुरु असतानाच आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्याही नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राहुल कुल यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. वाचाबारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर

राहुल कुल यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी मिळवत विजय संपादित केला होता.

मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध

विधानसभेत काम करताना राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांमध्ये राहुल कुल यांचे नाव घेतले जाते. येणार्‍या निवडणुकीत राहुल कुल भाजपशी हातमिळवणी करुन आपल्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवतात का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधले जात आहेत. त्यांची ही उपस्थिती लोकसभा निवडणुकीत पत्नीच्या उमेदवारीसाठी की येत्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

बारामती लोकसभेतील कांचन कुल यांच्या उमेदवारीबाबत आमदार राहुल कुल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच राहुल कुल यांनी भाजपच्या कार्यक्रमात लावलेली हजेरी ही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र ते आता लोकसभा निवडणुकीबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *