स्वाभिमान म्हणजे नक्की काय पवारसाहेब? शिवसेनेचा खोचक सवाल

तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

स्वाभिमान म्हणजे नक्की काय पवारसाहेब? शिवसेनेचा खोचक सवाल

मुंबई : ‘पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? (Saamana on Sharad Pawar) स्वत: पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय ‘गुप्तगू’ सुरू आहे’ अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने शरद पवार यांना कानपिचक्या (Saamana on Sharad Pawar) लगावल्या आहेत.

‘पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले.’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. पवार यांनी सत्य सांगितले आहे (Saamana on Sharad Pawar). शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत वेळोवेळी जे लोक गेले त्यांचा त्या त्या वेळी पराभव झाला आहे. छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांचा माझगावात पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत नाशिकला त्यांना मतदारांनी धूळ चारली. नारायण राणे यांचा कोकणात पराभव झाला व नवी मुंबईत गणेश नाईक पराभूत झाले. एखादा अपवाद वगळता भुजबळ-राणेंबरोबर गेलेले आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत, पण तो इतिहास झाला. आता इतिहास बदलणारे वारे वाहत आहेत’ असं म्हणत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही शिवसेनेने टोला लगावला आहे.

सोडून जाणाऱ्यांच्या अंतःकरणात मी आहे असं ऐकतोय : शरद पवार

‘उदयनराजे भोसले यांनी पक्षांतर करताच म्हणजे ते भाजपात जाताच त्यांची सर्व कामे मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी केली. रस्त्यासाठी पन्नास कोटी दिले. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. सातारच्या विश्रामगृहात रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांच्या आदेशाने ही सर्व कामे चुटकीसरशी केली. उदयनराजे यांची कामे एका रात्रीत झाली, पण नवी मुंबईचे गणेश नाईक ठाण्यातील भाजप कार्यक्रमात गेले. तेथे त्यांना बसायला कुणी खुर्ची दिली नाही असे प्रसिद्ध झाले. येथे पुन्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतोच’ असंही ‘सामना’त म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *