ट्रम्प यांनी ज्या ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ दमदार आवाजात मागितल्या, त्यांचे उत्पादन इंदिरा गांधींच्या काळात सुरु : सामना

डॉक्टरसाहेब (नड्डा), देशात व्हेंटिलेटर्स आधीही होतेच, ते चीनकडून मागवले जात नव्हते, अशा शब्दात 'सामना'तून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या 'आत्मनिर्भर भारत'विषयीच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला (Saamana on J P Nadda Statement on Atmanirbhar Bharat)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:50 AM, 1 Jun 2020
ट्रम्प यांनी ज्या 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' दमदार आवाजात मागितल्या, त्यांचे उत्पादन इंदिरा गांधींच्या काळात सुरु : सामना

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे. त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत, पण नोटाबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात जे नाहक मेले, ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार आवाजात भारताकडे मागितल्या, त्या गोळ्यांचे उत्पादन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरु झाले, असं सांगत ‘सामना’तून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना कानपिचक्या देण्यात आल्या. (Saamana on J P Nadda Statement on Atmanirbhar Bharat)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अर्थात साठ वर्षात चुका झाल्या, तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या. गेल्या दोन महिन्यात चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करुन देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत, हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटाबंदी आणि लॉकडाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?” असा थेट सवाल विचारण्यात आला आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस घेऊन भारतात आले, संजय राऊत यांचा दावा

“कोरोनाच्या काळात टेस्ट क्षमता दहा हजारांवरुन 1.60 लाखांवर गेली. देशात दररोज 4.50 लाख पीपीई किट्स बनवले जात आहेत. 58 हजार व्हेंटिलेटर तयार होत आहेत, हे आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही का? असा प्रश्न डॉ. नड्डा विचारतात. (Saamana Nadda Atmanirbhar Bharat) याआधी देशातून पोलिओसारखे आजार हद्दपार केले. टीबी, मलेरिया नियंत्रणात आणला हे कोणत्या सरकारने केले? कोरोना आज आला. त्याआधी प्लेगसारखी महामारी येऊन गेली. डॉक्टरसाहेब (नड्डा), देशात व्हेंटिलेटर्स आधीही होतेच, ते चीनकडून मागवले जात नव्हते. ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या ट्रम्प यांनी दमदार आवाजात भारताकडे मागितल्या (कोरोनाशी लढण्यासाठी), त्या गोळ्यांचे उत्पादन इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरु झाले आणि त्याच आत्मनिर्भरतेतून देशात वैद्यकीय क्रांतीची बीजे रोवली, हे कसे विसरता येईल?” असेही सामनातून विचारले आहे.

(Saamana on J P Nadda Statement on Atmanirbhar Bharat)