राजस्थान : निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल अजून लागायचा आहे. पण मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे दोन गट आधीच आमनेसामने आले आहेत. एक्झिट पोलचे आकडे पाहिल्यानंतर काँग्रेस नेत्यांना आता मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत. यातूनच दोन गटांमध्ये शाब्दिक वादावादी झालेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आणि जयपूर शहर जिल्हा अध्यक्ष प्रताप सिंह खाचरियावास यांनी दिलेल्या एका वक्तव्यामुळे काँग्रेसमधील …

राजस्थान : निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल अजून लागायचा आहे. पण मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे दोन गट आधीच आमनेसामने आले आहेत. एक्झिट पोलचे आकडे पाहिल्यानंतर काँग्रेस नेत्यांना आता मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत. यातूनच दोन गटांमध्ये शाब्दिक वादावादी झालेली पाहायला मिळाली.

काँग्रेसचे उमेदवार आणि जयपूर शहर जिल्हा अध्यक्ष प्रताप सिंह खाचरियावास यांनी दिलेल्या एका वक्तव्यामुळे काँग्रेसमधील राजकीय वातावरण तापलं आहे. खाचरियावास यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली.

“आमचे नेते हे राहुल गांधी आहेत आणि ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री पदासाठी पाच जणांची नावं दिली असल्याचं वृत्तपत्रातून वाचण्यात आलं. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर आहे. पण या बाबतीत ते निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री कोण असेल याचा अंतिम निर्णय राहुल गांधी आणि आमदार ठरवतील,” असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

खाचरियावास यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशोक गहलोत गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. खाचरियावास हे काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधातील अनेक आंदोलनात खाचरियावास हे सचिन पायलट यांच्यासोबत दिसून आले होते.

दुसरीकडे अशोक गहलोत यांनीही या व्हिडीओतील वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. खाचरियावास यांनी काहीही चुकीचं बोललेलं नाही. मी कुणाला मुख्यमंत्री कसं बनवू शकतो? मी असा निर्णय कधी घेतलाच नाही. याबाबत निर्णय राहुल गांधी आणि हायकमांडकडून घेण्यात येतो, असं गहलोत म्हणाले.

अशोक गहलोत हे काँग्रेसच्या राजस्थानमधील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. तर सचिन पायलट यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून म्हटलं जातं. यापूर्वी अशोक गहलोत यांनी राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यामुळे आता निकालापूर्वी राजस्थानमध्ये एक्झिट पोलने अस्वस्थता वाढवली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *