AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sada Sarvankar: ‘ठाकरेंनी निधी दिला नाही, पण शिंदेंना मागताच 25 कोटी दिले’, सदा सरवणकरांनी मांडली कैफियत, शिंदेंचे मानले आभार

शिंदे सरकारच्या काळात कामे किती वेगात मार्गी लागतात याचे उदाहरणच सदा सरवणकर यांनी दिले आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसंच वीर सावरकर मार्ग सुशोभिकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडे 25 कोटींचा निधी मागितला होता. पण निधी देता येणार नाही असे पत्र 'एमएमआरडीए' ला ने दिले होते.

Sada Sarvankar: 'ठाकरेंनी निधी दिला नाही, पण शिंदेंना मागताच 25 कोटी दिले', सदा सरवणकरांनी मांडली कैफियत, शिंदेंचे मानले आभार
आ. सदा सरवणकरImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 6:09 PM
Share

मुंबई :  (Eknath Shinde) शिंदे गटातील आमदार आतापर्यंत (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारांसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी करीत होते. पण आता शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर त्यांचा सूर बदलत आहे. यापूर्वी अशी उदाहरणे समोर आलेली आहेत. दादर विधानसभा मतदार संघाचे  (Sada Sarvankar) आमदार सदा सरवणकर यांनी तर हे उदाहरणासहीत स्पष्ट केले आहे. शिंदे सरकारच्या काळात कामे लागलीच मार्गी लागतात मात्र, याच कामासाठी पूर्वी अडवणूक केली जात असल्याचे म्हणत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवसेना आणि पक्षप्रमुख यांच्याबद्दल न बोलणारे आमदार देखील उघडपणे व्यक्त होऊ लागले आहेत. सरवणकर यांनी वीर सावरकर मार्ग सुशोभिकरण आणि वरळी मतदार संघातील सुशोभिकरणाचा विषय समोर करीत हा खुलासा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात होत असलेली अडचण आणि आता कामे मार्गी लागत असल्याचे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणे आहे.

ठाकरे अन् शिंदे सरकारमधला असा हा फरक

शिंदे सरकारच्या काळात कामे किती वेगात मार्गी लागतात याचे उदाहरणच सदा सरवणकर यांनी दिले आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भक्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसंच वीर सावरकर मार्ग सुशोभिकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडे 25 कोटींचा निधी मागितला होता. पण निधी देता येणार नाही असे पत्र ‘एमएमआरडीए’ ला ने दिले होते. तर दुसरीकडे 22 जुलै रोजी त्यांनी दादर मतदार संघ सुशोभित करण्यासाठी 22 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले तर 11 ऑगस्ट 2022 ला ‘एमएमआरडीए’ ने आपल्याला निधी उपलब्ध झाला आहे असं पत्र पाठवले असल्याचे सरवणकर म्हणाले आहेत.

नागरिकांच्या समस्याही कायमच

वरळी मतदार संघात सोई-सुविधा आणि हा मतदार संपला की, रस्त्यावर आणि फुटपाथवर खड्डेच असायचे. विकास कामातील हा दुजाभाव समोर असून देखील काही करता येत नव्हते याची खंत असल्याचे सरवणकर यांनी बोलून दाखवले आहे. हे पाहून मन व्यतिथ व्हायचे. पण काही करता येत नव्हते. सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देत असतानाही यश येत नव्हते. त्यामुळे ना नागरिकांच्या समस्या मार्गी लागायच्या ना माझे समाधान व्हायचे असेही सरवणकर म्हणाले आहेत.

तर वरळीपेक्षा उत्कृष्ट काम

शिंदे सरकारची स्थापना होऊन 1 महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असतानाच कामा-कामातील फरक आता मांडला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागलीच 25 कोटीचा निधी मंजूर केल्याने आता विकास कामाला गती मिळणार आहे. शिवाय त्यांनी अशीच मदत कायम केली तर वरळापेक्षा दादर मतदार संघात अधिक विकास कामे केली जातील असा विश्वास सरवणकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्तांतर झाले की कोण-कोणते बदल समोर येतात हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे.

ही बातमी पण वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.