“चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर…! अन् माझ्या सरणावरची फुले..” सदाभाऊ खोत यांचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर टीकास्त्र

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसामुळं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची मागणी केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या म्हणजेच राष्ट्रवादी कांग्रेसच्या सत्काराच्या कार्यक्रमावरुन यावरुन जंयत पाटील आणि संजय बनसोडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

"चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर...! अन् माझ्या सरणावरची फुले.." सदाभाऊ खोत यांचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर टीकास्त्र
सदाभाऊ खोत जयंत पाटील

मुंबई:रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसामुळं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची मागणी केलीय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या म्हणजेच राष्ट्रवादी कांग्रेसच्या सत्काराच्या कार्यक्रमावरुन यावरुन जंयत पाटील आणि संजय बनसोडे यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी “चक्रिवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर…! अन् माझ्या सरणावरची फुले चला उधवुया मंत्र्याच्या अंगावर….!!,अशा शब्दात जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मायबाप सरकार थेट मदत द्या

‘राजाने मारले आणि पावसाने झोडपले’ तर दाद कुणाकडे मागायची अशीच अवस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आज झाली आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. मायबाप सरकार आता फक्त आश्वासन नाही तर थेट मदत द्या. माझ्या शेतकरी बांधवांना धीर द्या, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारकडं केली आहे.

पूरस्थिती गंभीर, प्रशासनानं शेताच्या बांधावर यावं: पंकजा मुंडे

पूर परिस्थिती ची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे , आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्या कडेला पाहणी करताये, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल, आणि अशी पाऊले ते उचलतील अशी मला अपेक्षा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

पंचनामा न करता मदत द्या, प्रविण दरेकरांची मागणी

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केली आहे. आता सरकार मधील मंत्री ही बोलले असून ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. आता तर सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे सुद्धा म्हणाले की पंचनामे न करता सरसकट मदत केली जाईल त्यामुळं राज्य सरकारनं मदत जाहीर करावी, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. विजय वडेट्टीवार यांचा
नेहमी केंद्राकडे बोट दाखवायचं असा ठरलेला कार्यक्रम दिसतो आहे, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. केंद्राकडं बोट दाखवण्यापेक्षा आम्ही मदत करू शकत नाही, असं सरकारने जाहीर करावं, असं प्रविण दरेकर म्हणाले.

इतर बातम्या:

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका; पंकजा मुंडेंनी जयंत पाटील, धनंजय मुंडेंना डिवचले

गोव्यात भाजपकडून लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा ‘खो खो’चा खेळ सुरू; संजय राऊतांची टीका

Sadabahu Khot slam Jayant Patil over felicitation programme and demanded package for heavy rain affected farmers

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI