AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोव्यात भाजपकडून लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा ‘खो खो’चा खेळ सुरू; संजय राऊतांची टीका

गोव्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. (sanjay raut slams goa bjp government amide forthcoming election)

गोव्यात भाजपकडून लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा 'खो खो'चा खेळ सुरू; संजय राऊतांची टीका
sanjay raut
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 10:40 AM
Share

मुंबई: गोव्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. (sanjay raut slams goa bjp government amide forthcoming election)

संजय राऊत यांनी आधी ‘सामना’च्या अग्रलेखातून गोव्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केलं आहे. लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो खोचा खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे. जे निवडून आले आहेत ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जात आहेत त्यांना लाज नाही असं म्हणत राऊत यांनी काँग्रेस आणि भाजपवर शरसंधान साधलं.

22 जागांवर लढणार

गोव्यात पक्ष फोडले जातात आणि सत्ता हस्तगत केली जाते. महाराट्रात आम्ही पक्ष फोडले नाहीत तर आम्ही तीन पक्ष एकत्र आलो, अस राऊत म्हणाले. गोव्यात आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेची गोव्यात ताकत आहे. आम्ही 22 जागा लढवणार आहोत. गोव्याच सरकार रोज नवीन थापा मारत आहे. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हौदोस घातला आहे. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेवर आला. आता ते त्यांच समर्थन करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

हे नैतिकतेचे राजकारण नाही

दरम्यान, दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही गोव्याच्या राजकारणावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो स्वतःच्या ताकदीवर नाही. मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप अल्पमतात होता. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 17 आमदार जिंकूनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास उशीर केला. या काळात भाजपने फोडाफोड करून बहुमत विकत घेतले. हे सर्व काय व कसे घडले हे गोवेकरांना समजले आहे. गोव्यात 17 आमदारांवरून काँग्रेस पक्ष चारवर आला. भाजपचा आकडा फुगला. हे काही नैतिकतेचे राजकारण नाही, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

गोव्याचे कारभारी इस्टेटी घेण्यात मश्गूल

भाजपने स्वबळावर 20-25 जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसे काहीच झाले नाही. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे. कोविड काळात तर सरकारने स्वतःलाच ‘मृत’ घोषित केल्याने गावागावांत कोरोनाने कहर केला व त्यात लोकांचे बळी गेले. गोव्यातील आरोग्य व्यवस्था साफ कोलमडून पडली आहे. सरकारातले मंत्री व त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्त इस्टेटी विकत घेण्यात मशगूल आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल.

भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी

भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल. भाजप ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके ‘बीफ’ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय? पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, पण गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत. या जुगारी व्यवसायातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात व निवडणुका लढवल्या जातात. पोर्तुगीजांविरुद्ध लढलेला गोवा या नव्या वसाहतवाद्यांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. (sanjay raut slams goa bjp government amide forthcoming election)

संबंधित बातम्या:

भयंकर! कोरोनाऐवजी रेबीजची लस दिली, कळव्यातील धक्कादायक प्रकार; नर्स निलंबित

मोफत शिवभोजन थाळी लवकरच बंद!, 1 ऑक्टोबरपासून पैसे मोजावे लागणार

अतिवृष्टी, पुरस्थितीचा अजित पवार यांनी घेतला आढावा, जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

(sanjay raut slams goa bjp government amide forthcoming election)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.