मोफत शिवभोजन थाळी लवकरच बंद!, 1 ऑक्टोबरपासून पैसे मोजावे लागणार

मागील काही महिन्यांपासून गरजू लोक या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेत होते. मात्र, आता कोरोना निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसं परिपत्रकच राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.

मोफत शिवभोजन थाळी लवकरच बंद!, 1 ऑक्टोबरपासून पैसे मोजावे लागणार
1 ऑक्टोबरपासून मोफत शिवभोजन थाळी बंद होणार
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 8:32 PM

पुणे : कोरोना संकटाच्या काळात कडक लॉकडाऊन आणि निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सतावू लागला होता. त्यामुळे गरजू लोकांसाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही महिन्यांपासून गरजू लोक या मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेत होते. मात्र, आता कोरोना निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसं परिपत्रकच राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं आहे. (Free Shivbhojan Thali will be closed from 1 October)

‘शिवभोजन थाळी’साठी 10 रुपये मोजावे लागणार

राज्य सरकारनं मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता शिवभोजन थाळीसाठी 1 ऑक्टोबरपासून 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तशी माहिती शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं पहिल्यांना 14 मे 2021, पुढे 17 जून 2021 आणि 30 जून 2021 अशी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता 14 सप्टेंबर रोजीही एकदा मुदतवाढ देण्यात आली होती.

शिवभोजन थाळी केंद्र चालकांना सरकारकडून थाळीमागे प्रत्येकी 40 रुपये अनुदान मिळते. तर 10 रुपये ग्राहकाकडून मिळतात. हे अनुदान पुरवठा विभागाकडून केंद्र चालकाच्या बँक खात्यात दर 15 दिवसांनी जमा केले जातात, असंही ढोले यांनी यावेळी सांगितलं.

‘शिवभोजन थाळी’चं पार्सलही बंद होणार

राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केलं होतं. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. मर्यादित कालावधीपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील अनेक लोकांपर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहोचली आहे. पण आता ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी मोफत सुविधा देखील बंद केली जाणार आहे. 1ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर पार्सल देखील ऑक्टोबर महिन्यापासून बंद केले जाणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 हजार लोक लाभार्थी

पुणे आणि पिंपरी चिंचवडज शहरात मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु होती. या थाळीला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता दोन्ही शहरात मिळून एकूण 37 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. त्यातून रोज 6 हजार पेक्षा जास्त गरजू लोकांची पोटाची भूक भागवण्याचं काम केलं होतं. दरम्यान, अजून दोन दिवस मोफत शिवभोजन थाळी मिळणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारपासून शिवभोजन थाळीसाठी 10 रुपये मोजावे लागणार आहेत.

इतर बातम्या : 

Breaking : ईडीकडून अनिल परबांची तब्बल 8 तास चौकशी! तपासाला सहकार्य करणार, परबांची ग्वाही

किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफांवर तिसरा मोठा आरोप! आता मुश्रीफांचं प्रत्युत्तर

Free Shivbhojan Thali will be closed from 1 October

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.