AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : आदित्य ठाकरे म्हणाले, “बंडखोरांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही”, “लोकशाहीला जनता जन्म देते विसरलात का?”, खोतांचा सवाल

Shivsena : "लोकशाहीला जनता जन्म देते विसरलात का?", सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरे यांना सवाल

Shivsena : आदित्य ठाकरे म्हणाले, बंडखोरांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, लोकशाहीला जनता जन्म देते विसरलात का?, खोतांचा सवाल
| Updated on: Jun 27, 2022 | 11:29 AM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या इतर मंत्री आणि आमदारांनी बंड केलं. थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. या बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी तर या बंडखोर आमदारांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, असा प्रण केलाय. त्यावर आता सदाभाऊ खोतांनी (Sadabhau Khot) आदित्य ठाकरे यांनी सवाल केलाय. “लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते. आदित्यजी, हे आपण कसं बरं विसरलात…?”,असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सदाभाऊ खोत यांचं ट्विट

“बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा जन्माला येतो आणि त्याला जन्माला घालणारी ही सर्वसामान्य जनताच असते. आदित्यजी हे आपण कसं बरं विसरलात..?”, असं ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

आदित्य काय म्हणाले होते?

या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही अशी थेट धमकीच आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे दिली आहे. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीत समोरासमोर या असे चॅलेंजही आजित्य ठाकरे यांनी दिले आहे.20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होती. यानंतर 20 जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केले. संदिपान भुमरे, संजय शिरसाट, जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला असा खळबळजनक दावाही आदित्य यांनी भाषणात केला आहे. शिवसेनेने मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेले दमदार भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.