राजकीय दुकान चालविण्यासाठी राजू शेट्टींचं आंदोलन, हिम्मत असेल सरकारबाहेर पडावं; सदाभाऊ खोत यांचं आव्हान

राजकीय दुकान चालविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आंदोलन करत आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सरकारबाहेर पडावं, असं खुलं आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांनी दिलं आहे. त्यांचा सरकारबरोबर जाऊन भ्रमनिरास झाल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी खोत यांनी केला.

राजकीय दुकान चालविण्यासाठी राजू शेट्टींचं आंदोलन, हिम्मत असेल सरकारबाहेर पडावं; सदाभाऊ खोत यांचं आव्हान
Raju Shetti Sadabhau Khot
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 11:41 AM

नांदेड : राजकीय दुकान चालविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आंदोलन करत आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सरकारबाहेर पडावं, असं खुलं आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजू शेट्टी यांनी दिलं आहे. त्यांचा सरकारबरोबर जाऊन भ्रमनिरास झाल्याचा पुनरुच्चार देखील यावेळी खोत यांनी केला.

सदाभाऊ खोत यांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान

राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे राजकीय दुकान चालवण्यासाठी आहे. या सरकार कडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टी यांनी बाहेर पडावे, असं खुलं आव्हान देताना राजू शेट्टींचं शेतकऱ्यांबाबत प्रेम पुतना मावशीचं आहे, अशी जलजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर केलीय.

शेट्टींचा आमदारकीचा प्रश्न ऐरणीवर, त्यांची काशी झालीय

“त्यांचा आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. मला वाटतं की त्यांचा भ्रमनिराश तेव्हा लगेच झालेला होता, कारण सदाभाऊ खोत मंत्री असल्यामुळं. मग आता भ्रमनिराश झाला की नाही? झाला असला तर आता त्यांनी आत्मक्लेष यात्रा दुसऱ्यांदा काशीपर्यंत काढावी, जेणेकरून मी यांच्याकडे जाऊन माझी काशी झाली म्हणून मी आता काशीला अंघोळ करायला आलोय”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावलाय.

राजू शेट्टींची राष्ट्रवादीवर टीका

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले.

तर करेक्ट कार्यक्रम करेन

मला त्या यादीतून का वगळण्यात आलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावललं की नाही हे मलाही माहीत नाही, असं सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे म्हणून मला डावलले गेले आहे. मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

12 आमदारांच्या यादीत राजू शेट्टीचं नाव आहे

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. ते शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी शेट्टींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

(Sadabhau Khot Open Challenge to Raju Shetti)

हे ही वाचा :

“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला

‘राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील, 12 सदस्यांमध्ये त्यांचं नाव’; शरद पवारांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.