त्यावेळी भाजप नेते रमेश कराड शिवबंधन बांधणार होते, पण…. निलंगेकरांचा दावा

युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजप सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी सचिन देशमुख यांना सेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कराड यांचा सेनाप्रवेश टळला, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. (Sambhaji Patil Nilangekar Ramesh Karad )

त्यावेळी भाजप नेते रमेश कराड शिवबंधन बांधणार होते, पण.... निलंगेकरांचा दावा
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 8:47 AM

लातूर : 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने लातूर ग्रामीणच्या जागेचा आग्रह धरल्यामुळे भाजप नेते रमेश कराड (Ramesh Karad) शिवसेनेत जाणार होते. मात्र ऐनवेळी शिवसेनेने उमेदवार बदलला, आणि कराड यांचा सेनाप्रवेश टळला, असा दावा भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे. (Sambhaji Patil Nilangekar claims Ramesh Karad was about to join Shivsena before 2019 Vidhansabha Election)

रमेश कराड भाजप सोडणार होते, तेव्हाच…

2014 मध्ये रमेश कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजप उमेदवार होते. त्यांना 93 हजार मतं मिळाली होती. अवघ्या सात ते आठ हजार मतांनी त्यांची जागा गेली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची युती होती. त्यावेळी कराड यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात असताना शिवसेनेने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला. अखेर युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजप सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यास सांगितलं, कराड पक्षप्रवेश करणारच होते, त्याचवेळी सचिन देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कराड यांचा सेनाप्रवेश टळला, असा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे भाजपकडून विधानपरिषद आमदार आहेत. कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. रमेश कराड यांनी दोन वर्षांपूर्वीही विधानपरिषद निवडणुकीत मोठी खेळी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांची मोठी अडचण झाली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती.

2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता.

विधानसभा निवडणुकीला निराशा

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळीही रमेश कराड यांची निराशा झाली होती. शिवसेना-भाजप युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे रमेश कराड यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा सूर आळवल्यानंतर अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं रमेश कराड यांनी जाहीर केलं होतं. (Sambhaji Patil Nilangekar claims Ramesh Karad was about to join Shivsena before 2019 Vidhansabha Election)

“शिवसेना उमेदवाराला शिवसैनिकही ओळखत नव्हते”

लातूरमधील स्थानिक स्वराज्य संस्था रमेश कराड यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लातूर ग्रामीणची जागा कराड यांना सुटणार, हे निश्चित मानलं जात होतं. मात्र जागा मागून घेऊन शिवसेनेने ऐनवेळी सचिन देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. सचिन देशमुख यांना शिवसैनिकही ओळखत नव्हते. त्यामुळे भाजपसोबत युती असताना शिवसेना काँग्रेसला बाय देत होती का? शिवसेना-काँग्रेसचं आघाडी करण्याविषयी आधीच ठरलं होतं का? भाजपला धोका देण्याचं आधीच ठरलं होतं का? असे प्रश्न निलंगेकरांनी उपस्थित केले.

“धीरज देशमुख नोटाच्या विरोधात निवडून”

लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस उमेदवार (धीरज देशमुख) वरळीत राहतात. त्यांचं सतत मुंबईला येणं-जाणं असतं. लातुरातील सामान्य माणसालाही हे माहित आहे. काँग्रेस उमेदवाराला विचारा, तुम्ही कोणाच्या विरोधात निवडून आलात, तर ते सांगतील आम्ही ‘नोटा’च्या विरोधात निवडून आलो. कारण ‘नोटा’ला तब्बल 28 हजार मतदान झालं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झालं, याकडे निलंगेकरांनी लक्ष वेधलं.

संबंधित बातम्या 

मतदारसंघ शिवसेनेला सुटला, रमेश कराड यांची पुन्हा निराशा

रमेश कराड यांच्यावर अखेर बंडखोरीची वेळ, अपक्ष अर्ज भरणार

 पंकजाताईंनी अभ्यास केला, कराडांना उमेदवारी मिळवून दिली, मला जमलं नाही : राम शिंदे

(Sambhaji Patil Nilangekar claims Ramesh Karad was about to join Shivsena before 2019 Vidhansabha Election)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.