संदीप देशपांडेंकडून शिवसैनिकांसाठी ‘खास’ फोटो शेअर

संदीप देशपांडेंकडून शिवसैनिकांसाठी 'खास' फोटो शेअर


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यातून मोदी सरकारवर टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी-शाह मुक्त भारतासाठी त्यांच्या राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्षांना निवडून देण्याचं अप्रत्यक्ष आवाहन जनतेला केलं. पण त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपसह शिवसैनिकांमध्येही नाराजीचं वातावरण पसरलं आहे. या नाराजीवर फुंकर घालण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक खास फोटो ट्वीट केला आहे.

भाजपवाले म्हणतात, राष्ट्रवादी-काँग्रेस मला वापरुन घेतायत, पण मी वेडा नाही : राज ठाकरे

या फोटोमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक या व्यंगचित्राच्या साप्ताहिकाचे मुखपृष्ठ दिसत आहेत. 8 जून 1980 रोजी प्रसिद्ध झालेल्या या मार्मिकच्या पहिल्या पानावर ‘’छत्री उडाली, कमळे बुडाली जनता झाली धन्य धन्य !’’ असं शीर्षक छापण्यात आलं होतं. 1980 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या मार्मिक साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्याबाबतचे हे व्यंगचित्र आहे. हा फोटो ट्वीट करत मनसेने शिवसैनिकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या फोटोला कॅप्शन देताना संदीप देशपांडे यांनी माझ्या सर्व शिवसैनिक मित्रांसाठी असे म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या पहिल्या 6 सभांच्या तारखा, ठिकाणं ठरली!

अवघ्या दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी सरकारविरोधात जबरदस्त टीका केली. त्यावेळी त्यांनी ज्यांच्यावर तुमचा विश्वास राहिला नाही, त्यांना पुन्हा निवडून देण्याची गरज नाही. असं म्हणत त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच यानंतर त्यांनी माझ्या या प्रचाराचा फायदा आघाडी सरकारला झाला तर होऊ द्या असेही ते म्हणाले. परंतु त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना नाराज असल्याचे दिसत होते. म्हणून संदीप देशपांडे यांनी मार्मिक या व्यंगचित्रातील फोटो ट्वीट करत शिवसैनिकांमधली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामुळे शिवसैनिकांमधली नाराजी दूर होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI