राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा

"आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय. राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु", असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला (Sandeep Deshpande slams Maharashtra Government).

राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु, संदीप देशपांडे यांचा इशारा

ठाणे : “आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय” असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला (Sandeep Deshpande slams Maharashtra Government).

सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी कर्जत पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चौघांवर कलम 107 अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेते गजानन काळे, अतुल भगत, संतोष धुरी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले. यावेळी संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली (Sandeep Deshpande slams Maharashtra Government).

“सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का माहिती नाही. पण हाय कोर्टाने कान टोलचे आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी सुधारलं पाहिजे. लोकांची उपासमारी होत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज तीच गोष्ट हाय कोर्टाने म्हटली आहे. सरकार घरी बसून जबाबादरी सांभाळत आहे. सरकारने सर्वसामान्यांची जबाबदारी घेऊन रेल्वे चालू केली पाहिजे”, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

मुंबई लोकल सर्वसामन्यांसाठी लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून 21 सप्टेंबर रोजी लोकल प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत सहभागी झाले होते.

या आंदोलनानंतर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम 147, 153, 156 अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडेसह काही मनसे नेत्यांना यांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? संदीप देशपांडेंचा टोला

संदीप देशपांडे-संतोष धुरींच्या खांद्यावर राज ठाकरेंचा हात, सविनय कायदेभंग आंदोलनानंतर मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *