Sanjay kaka Patil : ..तर संजयकाकांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

तासगावच्या कारखान्याची बिलं अद्याप मिळालेली नाहीत. ती पूर्ण मिळायला हवी. तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह थाटामाटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार हे चालणार नाही, असा इशारा खराडे यांनी दिलाय.

Sanjay kaka Patil : ..तर संजयकाकांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
संजयकाका पाटील, खासदार, भाजपImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 9:02 PM

सांगली : भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांची पूर्ण ऊसबिलं दिली नाहीत तर 14 मे रोजी संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या RRC कारवाईच्या आदेशानुसार विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या सहकार्यामुळे नागेवाडी कारखान्याची (Nagewadi Sugar Factory) थकीत 6 कोटीची ऊस बिले व्याजासहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली. त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीने तहसीलदार शेळके यांच सोमवारी सत्कार करण्यात आला.

’14 मे ला संजयकाकांच्या मुलाच्या लग्नात गोंधळ घालू’

नागेवाडी कारखान्याची बिले मिळणे हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे. RRC कारवाईत 15 टक्के व्याजासहित बिले द्यावीच लागतात. ते शेतकऱ्यांवर मेहेरबानी करत नाहीत. तासगावची अर्धी बिले शेतकऱ्यांना मान्य नाहीत, पूर्ण बिले दिली नाहीत तर 14 मे रोजी खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या विवाहात गोंधळ घालू असा इशारा खराडे यांनी दिला आहे.

मुलाचा विवाह थाटामाटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार?

मागील वर्षभरापासून शेतकऱ्याच्या घरातील शुभ प्रसंग थांबले आहेत. त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नये. स्वाभिमानी वर्षभरापासून आंदोलन करत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी RRC कारवाईचा आदेश दिलाय. स्वाभिमानीच्या अनेक आंदोलनानंतर 35 कोटी शेतकऱ्यांना मिळाले. तासगावच्या कारखान्याची बिलं अद्याप मिळालेली नाहीत. ती पूर्ण मिळायला हवी. तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह थाटामाटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार हे चालणार नाही, असा इशारा खराडे यांनी दिलाय.

हे सुद्धा वाचा

..तर मुलाला शेतकरी 100 टक्के आशीर्वाद देतील

नागेवाडीच्या लिलावातील 9 कोटी रुपये तासगावच्या बिलासाठी मिळणार आहेत. उर्वरित जी रक्कम कमी पडेल त्याची संजयकाका पाटील यांनी तरदूद करावी आणि 100 टक्के बिलं द्यावीत म्हणजे मुलाला शेतकरी 100 टक्के आशीर्वाद देतील, असंही खराडे यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.