‘या जोकरांना दुसरा…’, अभिजीत दीपकेंच्या आरोपांना शिंदेसेनेच्या नेत्याचं प्रत्युत्तर; शिवसेनेच्या कामगिरीचे आकडेही मांडले
Shivsena On Abhijeet Dipke: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमधून सीजेपीला इशारा दिला आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पुढील ४८ तासांत राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही दिला. अभिजीत दीपकेंनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. यामुळे आता शिंदेसेना चांगलीच तापली आहे. यावर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. संजय निरुपम यांनी सीजेपीला नवे जोकर म्हणत टीका केली आहे.
कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, शिवसेना ही भाजपची एक ‘शेल कंपनी’ आहे. यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सीजेपीला राजकारणातील ‘नवा विदूषक’ म्हटले. पोस्टमध्ये संजय निरुपम म्हणाले की, आम्ही भारतीय राजकारणातील या नव्या जोकरांना सांगू इच्छितो की, शिवसेना ही कोणाचीही बनावट कंपनी किंवा प्रॉक्सी नाही. शिवसेना ही एक चैतन्यशील संघटना आहे. शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर सातत्याने काम करते, असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भारत की राजनीति में आए इन नए जोकरों को हम बताना चाहेंगे कि शिवसेना किसी की शेल कंपनी या प्रॉक्सी पार्टी नहीं है। शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे के विचारों पर सतत काम करनेवाला एक ज्वलंत संगठन है शिवसेना। हमारी पार्टी को महाराष्ट्र की जनता ने पिछले चुनावों 60 विधायक दिए(इसमें 3 निर्दलीय हैं), 7 सांसद चुनकर दिए, 1000 से ज़्यादा नगरसेवक और पार्षद दिए। यह वैभव किसी शेल कंपनी को नहीं,जन सामान्य के दिलों पर राज करनेवाले संगठन को मिलता है। हमारी पार्टी के मुख्य नेता एकनाथ शिंदे के नेतृत्व में महाराष्ट्र की जनता का अगाध विश्वास है। इतना विश्वास अर्जित करने के लिए इन जोकरों को दूसरा जन्म लेना पड़ेगा। इन जोकरों को यह भी बता देना चाहूँगा कि जिनके लिए ये टेसूएं बहा रहे हैं,उन्हें और उनकी पार्टी को महाराष्ट्र की जनता ने नकार दिया है। इसका कारण उनका निकम्मापन है। अंत में एक ज्ञान की बात: टीका-टिपण्णी करिए ,मगर तथ्यों के साथ। वरना इस देश की जनता बहुत समझदार है,ऐसा दौड़ाएगी कि छुपने की जगह नहीं मिलेगी।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 24, 2026
यानंतर संजय निरुपम यांनी शिंदेसेनेच्या कामगिरीची आकडेवारी मांडली आहे. संजय निरुपम म्हणाले की, गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या पक्षाला ३ अपक्षांसह ६० आमदार, ७ निवडून आलेले खासदार आणि १००० हून अधिक नगरसेवक दिले. हा गौरव कोणत्याही बनावट कंपनीला नव्हे, तर सर्वसामान्य लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या संघटनेला मिळतो, असं त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे. तेवढा विश्वास मिळवण्यासाठी या विदूषकांना पुनर्जन्म घ्यावा लागेल. मला या विदूषकांना हेही सांगायचे आहे की, ज्या व्यक्तीसाठी ते अश्रू ढाळत आहेत, त्या व्यक्तीला आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले आहे. याचे कारण त्यांची अकार्यक्षमता आहे. शेवटी एक शहाणपणाचा सल्ला देतो की, टीका करा, पण तथ्यांच्या आधारांवर करा. नाहीतर, या देशातील जनता खूप हुशार आहे. ते तुमचा इतका पाठलाग करतील की तुम्हाला लपायलाही जागा मिळणार नाही, असा थेट इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.
तर दुसरीकडे अभिजीत दीपकेंनी तीन मागण्या केल्या आहेत. ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांच्यावर फौजदारी खटला चालवावा आणि आदेश कोण देत होते याची चौकशी करावी. दुसरी मागणी अशी आहे की, सर्व आगामी निवडणुका स्थगित कराव्यात. २०२४ ची मतदार यादी पुनर्संचयित करावी आणि एसआयआर प्रक्रिया थांबवावी. तिसरी निवडणूक आयुक्तांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारा २०२३ चा कायदा रद्द करावा. नागरी समाजाचा समावेश असलेला एक नवीन कायदा लागू करावा.
