AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात, संजय राऊत ‘दगाबाज’ अपक्षांवर बरसले

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : निवडणुकांमध्ये काही घोडे असतात. ते नेहमीच विकायला तयार असतात. यावेळी या घोड्यांची जास्त बोली लागलेली असेल. त्यामुळेच आम्हाला हक्काची सहा मते मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात, संजय राऊत 'दगाबाज' अपक्षांवर बरसले
हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात, संजय राऊत 'दगाबाज' अपक्षांवर बरसलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2022 | 11:45 AM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) प्रचंड संतापले आहेत. राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी या पराभवाचे खापर थेट अपक्षांवरच फोडले. काही घोडे बाजारात नेहमीच असतात. हरभरे टाकले की ते कुठेही जातात. जिकडे हरभरे तिकडे घोडे असतात. अशाच काही घोड्यांनी दगाबाजी केली. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव केला असं सांगतानाच दगाबाजी करणाऱ्या या आमदारांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना पाहून घेऊ, असा इशाराही राऊत यांनी दिला. आघाडीसोबत असलेल्या अपक्षांची मते फुटली असली तरी आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. घोडेबाजारातील घोड्यांमुळे कोणताही परिणाम होत नाही. विशेषत: महाराष्ट्रात घोडे तिकडे असतील किंवा इकडे असतील… हरभरे टाकले की ते कुठेही जातात, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

निवडणुकांमध्ये काही घोडे असतात. ते नेहमीच विकायला तयार असतात. यावेळी या घोड्यांची जास्त बोली लागलेली असेल. त्यामुळेच आम्हाला हक्काची सहा मते मिळाली नाहीत. असे लोक कुणाचेच नसतात. अर्थात ज्या कुणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. कुणी मते दिले नाही हे आम्ही माहीत आहे, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.

आम्ही व्यापारात पडलो नाही

जे घटक पक्ष आहेत. छोटे पक्ष आहेत, जे शिवसेना किंवा आघाडीबरोबर आहेत. त्यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, बच्चू कडू, गडाख, यड्रावकर आणि इतरांची सर्व मते आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे उभे होते त्यांचे सहा सात मते पडली नाही. आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही. व्यापार केला नाही. तरीही आम्हाला 33 मते मिळाली हा आमचा विजय आहे. असा दावाही त्यांनी केला. तसेच हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. हरभरे काही अपक्षांनी खाल्ले आहेत, तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

दैदिप्यमान विजय नाही

आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही, याचा अर्थ असा नाही की कोणी तरी दैदिप्यमान विजय मिळवला. असं नाही. ठिक आहे. भाजपने एक जागा जिंकली. पहिल्या क्रमांकाची 33 मते आम्हाला मिळाली आहेत. 27 मते भाजपला मिळाली. तसे म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रिया वेगळी असते. पहिल्या पसंतीचे दुसऱ्या पसंतीचे मते पाहिली जातात, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?