AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिला काळजी घेण्याचा सल्ला, कारण…

बीडमध्ये हल्ला करणारे ते कार्यकर्ते आमच्या पक्षाचे नव्हते, हे मी आधीच सांगितलं आहे. ज्याच्याशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, तो मी कधीही मान्य करणार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हटले.

संजय राऊतांनी राज ठाकरेंना दिला काळजी घेण्याचा सल्ला, कारण...
sanjay raut raj thackeray
| Updated on: Aug 12, 2024 | 11:50 AM
Share

Sanjay Raut on Raj Thackeray : शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनंतर काही तासांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी पोस्ट लिहित याबद्दल प्रतिक्रिया दिली. “माझ्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे. तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका, हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा”, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. आता यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मराठी माणसांमध्ये भांडण लावायची नाहीत”

संजय राऊतांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या काळजी घेण्याच्या सल्ल्यावर प्रत्युत्तर दिले. “बीडमधील घटनेशी आमचा संबंध नाही, असे आम्ही तुम्हाला सांगितले होते. पण तरीही तुम्ही आम्हाला आव्हाने कसली देताय? आम्ही अधिकृतपणे सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला आणि शिवसेनेला तुम्ही आव्हान देताय? तुम्ही एकमेकांचे समर्थन करताय, चोर चोराचे समर्थन करतात. पण काहीही हरकत नाही. आम्हाला महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये भांडण लावायची नाहीत. जर कोणी लावत असेल, आम्हाला ते मान्य नाही”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“तुम्ही आम्हाला धमक्या देताय, बघून घेऊ वैगरे, मग हीच धमकी अहमद शाहा अब्दालीला द्या. जो महाराष्ट्राची लूट करतोय, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय, त्याला आवाहन द्या ना. हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाहा अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा. तिकडे शेपट्या घालण्याचे काम करता. आम्हीही हे बघून घेऊ. बीडमध्ये हल्ला करणारे ते कार्यकर्ते आमच्या पक्षाचे नव्हते, हे मी आधीच सांगितलं आहे. ज्याच्याशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, तो मी कधीही मान्य करणार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हटले.

“राज ठाकरेंनी काळजी घ्यावी”

यावेळी संजय राऊत यांना राज ठाकरेंनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी आम्हाला काळजी करण्याचा सल्ला देण्यापेक्षा त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. महाराष्ट्र लुटतात त्यांना काळजी घ्यायला सांगा. महाराष्ट्र लुटणाऱ्यांशी आम्ही लढत आहोत. अहमद शाह अब्दालीशी आम्ही लढत आहोत. आम्ही तुरुंगात जात आहोत. आम्ही ईडीपुढे शेपट्या घातल्या नाहीत, आम्ही तुरुंगात गेलो. आम्ही घाबरलो नाही.” असे म्हटले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

मी कालच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नका कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे तुम्हाला कळणार नाही. आणि ज्याची प्रचिती कालच आली. मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हणलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामध्ये विध्न निर्माण करणं आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्यांना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल, अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका

जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे, काल पण बोललो आहे, तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा, असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.