AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी फोडली!’ असं का केलं? राऊतांनी सांगितली 2 कारणं!

भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना टोला लगावला. देशाचं राजकारण रक्तरंजित होतं चाललं आहे अशी टीका केली. "शरद पवार जे म्हणत आहेत,

Sanjay Raut : 'भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी फोडली!' असं का केलं? राऊतांनी सांगितली 2 कारणं!
'भाजपला शिवसेना फोडायची होती, त्यांनी फोडली!' असं का केलं? राऊतांनी सांगितली 2 कारणं! Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 04, 2022 | 10:06 AM
Share

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत जलदगतीने घडत आहेत. याला कारणीभूत भाजप (BJP) असल्याचा आरोप महाविकास आघाडी (MVA) करीत आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून आरोप-प्रत्योरोप सुरू आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर राजकीय नाट्य दहा दिवस चाललं. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली असं विधान केलं आहे. त्यानंतर शिवसेनेला मुंबईत दुबळं करायचं आहे म्हणून भाजपाने शिवसेना फोडली असं देखील वक्तव्य केलं आहे. आज माध्यमाशी बोलताना संजय राऊत आक्रमक शैलीत पाहायला मिळाले. महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय गोष्टीवर त्यांनी आज भाष्य केलं.

देशाचं राजकारण रक्तरंजित होतं चाललं आहे

भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे, असा संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना टोला लगावला. देशाचं राजकारण रक्तरंजित होतं चाललं आहे अशी टीका केली. “शरद पवार जे म्हणत आहेत, त्यानुसार मध्यावधी निवडणुकांचा महाराष्ट्राला सामोरं जावं लागेल, गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात, अशी माझी माहिती आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं.

शिवसेनेला मुंबईत दुबळं करायचं

2019 मध्ये शिवसेनेला डावललं, 2022 मध्ये फोडलं, याचा अर्थ तुम्हाला शिवसेनेलं दुबळं करणं, तोडणं, हेच कारण आहे, असं संजय राऊत आज पहिल्यांदा म्हणाले. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. चार खासदारांनी भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिंदेची तडजोड करणार का, यावर बोलताना राऊतांचं मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो. पण शिवसेना पुन्हा उभी राहते. जोपर्यंत मुंबईत शिवसेना ताकदीनं उभी आहे. तोपर्यंत दिल्लीचे इरादे पूर्ण होणार नाही. महाराष्ट्राचे दिल्लीला तीन तुकडे करायचे आहेत. त्यातील एक तुकडा मुंबईचा आहे. मुंबईच्या धनसत्तेवर काही लोकांना ताबा हवा आहे. त्यासाठी काहींना शिवसेनेला कमजोर करायचं आहे. या सगळ्यांचं सूत्र या फोडाफोडीमागे आहे.

आजही शिवसैनिकी रस्त्यावर येतील आणि लढा देतील.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार