‘सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?’, अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत भडकले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत मात्र चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. (Sanjay Raut Criticized BJP over Ed Raid Anil Deshmukh Nagpur home)

'सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?', अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत भडकले
संजय राऊत आणि अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 11:57 AM

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मात्र चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. ‘सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?’, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. (Sanjay Raut Criticized BJP over Ed Raid Anil Deshmukh Nagpur home)

हे सगळे सत्ताप्रेरित आहे…

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीने छापेमारी केली. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का , ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय, हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. विनाकारण त्रास हा शब्द सरनाईक यांच्या पत्रात देखील होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाहीय, अशी आठवण राऊतांनी करुन दिली.

सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्याच्या महापौरांचा करा

जर सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

सध्या अघोषित आणीबाणी

आणीबाणीला विसरा आता. त्याचा बाऊ करु नये.. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी वाटते. राष्ट्रहितसाठी कठोर व्हायला हवं, असंही राऊत म्हणाले.

पुणे मनपाचं काल अमानविय काम

पुणे मनपाने काल अमानविय काम केलं. त्याचा मी निषेध करतो. घाईघाईने महापालिकेने निर्णय घेतला. कुणाचीही पर्वा न करता गरिबांच्या घरांवरुन बुलडोझर फिरवला. गरिबांना बेघर, निराधार केलं. त्या सगळ्या स्थानिक लोकांचा आक्रोष पाहून वाटत होतं की माणुसकी दाखवली पाहिजे, पण महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांकडे माणुसकी आहे कुठे, अशी टीका राऊत यांनी केली.

शरद पवारांचा सल्ला पंतप्रधानही घेतात

राजधानी नवी दिल्लीत किंबहुना शरद पवारांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठका सुरु आहे. भाजपविरोधी आघाडीची मोठी चर्चा आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज आहे, त्यांचा सल्ला तर खुद्द देशाचे पंतप्रधान, भाजपचे देशातील प्रमुख नेते घेतात. भाजपने विनाकारण आरोप करु नये.

काश्मिरला अमन  आणि शांततेची गरज

काश्मिरला अमन आणि शांततेची गरजेची आहे. गुपकार नेते आणि पंतप्रधान मोदी यांची बैठक झाली ती गरजेची आहे. गोळीसोबत बोलीही हवी. प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

(Sanjay Raut Criticized BJP over Ed Raid Anil Deshmukh Nagpur home)

हे ही वाचा :

BREAKING | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

काल अजित पवारांविरोधात CBI चौकशीचा ठराव, आज अनिल देशमुखांवर ED चे छापे

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.