AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत पुन्हा कडाडले, हस्तियाँ डूब जाती है म्हणत शाहांवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा ट्विट करत भाजपचे कान टोचले आहेत. "घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है", असे म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत पुन्हा कडाडले, हस्तियाँ डूब जाती है म्हणत शाहांवर निशाणा
संजय राऊत, शिवसेना
| Updated on: Feb 08, 2021 | 10:44 AM
Share

मुंबई : ‘आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती’, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केल्यानंतर त्याच शैलीत शिवसेनेकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीसुद्धा ट्विट करत भाजपचे पुन्हा एकदा कान टोचले आहेत. “घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है”, म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut criticizes Amit Shah for commenting on Shivsena)

“तुफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है और घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है

असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

नेमके प्रकरण काय ?

शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर 7 फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शाह यांनी ‘शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती,’ असे वक्तव्य केले होते. तब्बल दीड वर्षांनी अमित शाह यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे शाह यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले होते. त्यनंतर राऊत यांनी शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेत “1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली,” असे असे ट्विट केले होते.

त्यांनतर हा वाद इथेच न संपता राऊत यांनी आज (सोमवार) पुन्हा ट्विट करत गर्व असणाऱ्या कित्येक व्यक्तींचं अस्तित्व संपलेलं आहे, असे म्हणत शाह यांना टोला लगावला.

दरम्यान, 7 फेब्रुवारीच्या ट्विटमध्ये राऊत यांनी “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. मात्र, शिवसेना प्रत्येक वेळी अधिक जोमाने वाढली आहे,” असेही ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरण्याची शंका व्यक्त केली जात होती. मात्र, राऊतांच्या त्या ट्विटनंतर काँग्रेसकडून अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित बातम्या :

शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?

(Sanjay Raut criticizes Amit Shah for commenting on Shivsena)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.