AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya INS Vikrant Case : ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम, सोमय्यांच्या चार दिवसाच्या चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आज किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यांची सलग चार दिवस चौकशी करण्यात येणार आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Kirit Somaiya INS Vikrant Case : ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम, सोमय्यांच्या चार दिवसाच्या चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत
| Updated on: Apr 18, 2022 | 10:36 AM
Share

आयएनएस विक्रांत (INS Vikrant) बचाव मोहीमेत भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आज किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यांची सलग चार दिवस चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच हा पोलीस तपासाचा भाग असून, पोलीस या प्रकरणातील सत्य शोधून काढतीलच. ते ईडीपेक्षा अधिक चांगला तपास करतात असे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आयएनएस विक्रांत बचाव मोहीमेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा देखील दाखल झाला. आयएनएस विक्रांत प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स पाठवण्यात आले होते, मात्र समन्स पाठवूनही चौकशीसाठी हजर न राहिल्याने सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स पावठण्यात आले. तसेच चौकशीसाठी हजर न राहिल्यास फरार घोषित करू असा इशारा देखील देण्यात आला होता. त्यामुळे आता सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहवे लागणार आहे.

राज ठाकरेंवर निसाणा

राज ठाकरे हे आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यापूर्वी ते औरंगाबादमध्ये सभा देखील घेणार आहेत. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आयोध्याचे आणि शिवसेनेचे नाते राजकीय नसून, ते फार जुने असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयोध्याला ज्याला जायचे त्याने जावे असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मराठवाड्यातील जनता कायम शिवसेनेच्या पाठिमागे होती आणि असेल तिथे कोणाला सभा घ्यायची ते घेऊद्या असे देखील राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले आहे.

संबंधित बातम्या

दिलासादायक! पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबीचे प्रमाण कमी होण्याचा दर वाढला; जागतिक बँकेची माहिती

Maruti Suzuki: SUV कार बाजारात पुन्हा दमदार एन्ट्रीसाठी मारुतीची टोयोटाला साद

Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?