राठोडांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

संजय राठोड यांच्या वनमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut Sanjay Rathod)

राठोडांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
संजय राऊत आणि संजय राठोड

मुंबई: संजय राठोड यांच्या वनमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला आहे, असं म्हटलं आहे. संजय राठोड हे मंत्री असल्याने त्यांची चौकशी होणार नाही, असं विरोधकांना वाटतंय, यामुळे राठोड यांनी राजीनामा दिला. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला ते तयार आहेत, असं त्यांनी सांगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. (Sanjay Raut first comment on resignation of Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case)

मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून प्रकरणावर नजर ठेवून

संजय राऊत यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून याप्रकरणावर नजर ठेवून आहेत, अशी माहिती दिली. पोलिसांवर कोणताही दबाव नाही. राज्याचे पोलीस अत्यंत प्रोफेशनल आहेत. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआयनं पणं काय वेगळं केलं नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

“मी माझा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला” अशी पहिली प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली.

आमदारकीचा राजीनामा नाही

“माझ्यासोबत अनिल परब, अनिल देसाई होते, मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारकीचा राजीनामा दिला नाही. चौकशीनंतर परिणाम भोगायला पाहिजे होते, परंतु विरोधकांनी उद्या अधिवेशन चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, परंतु विरोधी पक्षांनी संसदीय कार्य चालू देणार नाही, असं म्हटलं, म्हणून पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला” असंही संजय राठोड यांनी सांगितलं.

हा उशिरा आलेला राजीनामा, देवेंद्र फडणवीसांची टीका

खरं म्हणजे पहिल्या दिवशी प्रकरण पुढं आल्यावर राजीनामा घ्यायला हवा होता. आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

संबंधित बातम्या

संजय राठोड यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी पत्नीचा आटापिटा?

उद्धव ठाकरेंचे दोन विश्वासू सहकारी, ज्यांच्या साक्षीने संजय राठोडांचा राजीनामा

(Sanjay Raut first comment on resignation of Sanjay Rathod in Pooja Chavan suicide case)

Published On - 5:12 pm, Sun, 28 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI