AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री केवळ भाजप दिलेला शब्द पाळतात, मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on CM Eknath Shinde and Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना घेऊन दिल्लीला जा अन् पंतप्रधान मोदी यांना भेटा!; संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला सल्ला दिला आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वाचा...

मुख्यमंत्री केवळ भाजप दिलेला शब्द पाळतात, मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
| Updated on: Oct 23, 2023 | 12:30 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप आणि बिल्डरला दिलेला शब्द पाळतात. समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत. एकदा जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटा. कायद्यात दुरुस्ती करा. त्यांना तसं सांगा. ते तुमचे लाडके आहात ना? मग त्यांना आरक्षण द्यायला सांगा. मनोज जरांगे पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जा आणि कायद्यात दुरुस्ती केलेलं प्रमाणपत्र घेऊन यावं, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जे तरूण आत्महत्या करत आहेत. ती मराठी मुलं आहेत. आज तिसरी आत्महत्या झाली. त्यांचं असं आत्महत्या करणं पाहावत नाही. सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे अजितदादा पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. उद्या मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपत आहे. तीन आत्महत्या झाल्या. पण सरकारच्या डोळ्यांची पापणी देखील हलत नाही. हे निर्दयीपणाचं लक्षण आहे, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा मतांसाठी भाजपने मराठ्यांचा चेहरा म्हणून तुम्हाला बसवलं आहे ना? सरकार जाहिराती करत आहे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ यासाठी तुम्हाला बसवलं नाही. तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी या राज्यामध्ये वातावरण बिघडू शकतं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत. ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही, आम्हाला कोणी सर्टिफिकेट नको, म्हणत आहेत. दिल्लीत केंद्रातील नेत्यांची भाषा वेगळी आहे. या आंदोलनामध्ये फूट पाडण्याची सधन मराठ्यांनी रणनीती आखली आहे का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. दुर्बल मराठा समाजासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने पाहावं, असं आवाहनही संजय राऊत यांनी शिंदे सरकारला केलं आहे.

जर चौथी आत्महत्या झाली. तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवादाचा एफआयआर दाखल करावा, असंही राऊत म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.