AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हो, ‘मातोश्री’वर पवार-ठाकरेंची दीड तास चर्चा, पण… : संजय राऊत

सरकारच्या स्थिरतेबाबत कोणी बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी, असा दावा संजय राऊत यांनी केला (Sanjay Raut on Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting at Matoshree)

हो, 'मातोश्री'वर पवार-ठाकरेंची दीड तास चर्चा, पण... : संजय राऊत
| Updated on: May 26, 2020 | 9:20 AM
Share

मुंबई : राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘मातोश्री’वर गेल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. मात्र सरकार मजबूत असल्याची ग्वाहीसुद्धा राऊतांनी यावेळी दिली. (Sanjay Raut on Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting at Matoshree)

“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका भाजप नेते वारंवार करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कालच राज्यपालांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे.

हेही वाचाराज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

शरद पवार यांनी लॉकडाऊन उठवून अर्थचक्र सुरु करण्यासाठी साखर उद्योग, कृषी उद्योगाला चालना देण्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत तात्काळ लॉकडाऊन उठवला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेसाठी पवार ‘मातोश्री’ची पायरी चढले असावेत, असाही कयास व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडिओ :

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला देणं किंवा महाविकास आघाडी तोडण्याची हीच वेळ असल्याचं सुचवणे, हे याचेच द्योतक मानले जाते. (Sanjay Raut on Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting at Matoshree)

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांच्या भेटीसाठी पवार राजभवनावर, पटेल म्हणतात कोश्यारींनी चहासाठी बोलावलं

गुजरात आणि गोव्यात एक भूमिका, पण महाराष्ट्रात विरुद्ध भूमिका का? शिवसेनेचा ‘सामना’तून राज्यपालांना सवाल

राज्यात आमचे नाही, शिवसेनेचे सरकार, कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

…तर मुख्यमंत्र्यांवर ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ येईल : संजय राऊत

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत

उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादी उद्ध्वस्त करेल, महाविकास आघाडी तोडण्याची हीच ती वेळ : स्वामी

(Sanjay Raut on Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting at Matoshree)

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.